श्री सुंदरनारायण मंदिर (नाशिक)

India / Maharashtra / Nashik / नाशिक
 मंदीर, हिंदू मंदिर
 Upload a photo

श्री सुंदरनारायण मंदिर :शके १६७८ मध्ये अर्थात सन १७५६ मध्ये स्थापन झालेले श्री सुंदरनारायण मंदिर सध्या अडचणींच्या विळख्यात सापडले आहे. त्वरीत दूर करावी अशी अडचण म्हणजे मंदिराच्या शेजारीच विद्युत डीपी आहे. ही डीपी भाविकांसाठी मोठी अडचण असून अनेकदा त्याबाबत आंदोलने झाली आहे. परंतु त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. सुंदरनारायण मं‌दिरावर वाढलेली वनस्पती पाहता हा अमूल्य ठेवा एखाद्या दिवशी कोसळून पडेल परंतु त्याचे कुणालाही सोयरेसुतक नाही. या मंदिराचा काही भाग पडलेला असून दिवसाआड दगड पडतच आहेत. धोक्याची सूचना देणारी एक पाटी लावून प्रशासनाने अंग काढून घेतलेले आहे. विशेष म्हणजे मंदिराला जो इजा पोहोचवेल त्याला पाच हजार रूपये दंड करण्याचा लेखी इशारा देण्यात आला आहे मात्र प्रशासनानेच धोक्याच्या सूचना देणाऱ्या पाट्या मंदिराला ठोकलेल्या आहेत. तसेच पाणी इतरत्र जाऊ नये यासाठी मंदिराचे अवशेष बांध म्हणून वापरण्यात आलेले आहे. मंदिराचे अवशेष असले तरीही ते खांब म्हणजे वैभव आहे याचा सोयिस्कर विसर प्रशासनाला पडलेला आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°0'24"N   73°47'30"E
  •  11 किमी.
  •  125 किमी.
  •  157 किमी.
  •  179 किमी.
  •  481 किमी.
  •  539 किमी.
  •  847 किमी.
  •  899 किमी.
  •  983 किमी.
  •  1026 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी