सुंदर नारायण मंदिर (नाशिक)

India / Maharashtra / Nashik / नाशिक
 मंदीर, ancient (en)

देवी लक्ष्मी आणि तुलसी यांच्यासमवेत असलेले भगवान विष्णू यांचे एकमेव सुंदर नारायण मंदिर रविवार कारंजा येथे गोदावरी नदी किनाऱ्याजवळ आहे. ऐतिहासिक कलाकुसर, रेखीव आणि आखिव अप्रतिम काम, दगडी बांधकाम आणि लाकडाचा केलेला खुबीने वापर अशी ओळख असलेल्या या मंदिराचे सौंदर्य काही औरच आहे. मुघल काळात या मंदिराचे नुकसान झाले. त्यानंतर गंगाधर यशवंत चंद्रचुड यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. पण, गेल्या काही वर्षांपासून मंदिराच्या सौंदर्याला आणि कलाकुसरीला नजर लागली आहे. या मंदिराच्या कळस आणि दगडी भिंतींचे मोठे नुकसान होत असतानाही राज्य सरकारने याकडे लक्ष दिलेले नाही. यासंदर्भात पुरातत्व विभागशी संपर्क साधला असता, त्यांनी या मंदिराच्या कामाबाबत असमर्थता दर्शविली आहे. मात्र, या मंदिराचे काम तातडीने हाती घेण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. सुंदरनारायण मंदिराची पाहणी करुन त्याच्या नूतनीकरणाचा अहवाल पुरातत्व विभागाने तयार केला. त्यानुसार अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यास राज्य सरकारने तयारी दर्शविली आहे. मात्र, मंदिराच्या कामासाठी आणखी अडीच कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याचे पुरातत्व विभागाचे म्हणणे आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°0'29"N   73°47'23"E
  •  11 किमी.
  •  125 किमी.
  •  157 किमी.
  •  179 किमी.
  •  480 किमी.
  •  539 किमी.
  •  847 किमी.
  •  899 किमी.
  •  983 किमी.
  •  1026 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी