बालाजी मंदिर (नाशिक)

India / Maharashtra / Nashik / नाशिक
 मंदीर, विष्णू मंदिर
 Upload a photo

गंगापूर रोडलगत गोदावरी नदीपात्राच्या काठावर नऊ एकर जागेमध्ये बालाजी मंदिराचा नयनरम्य परिसर आहे. या परिसरात भाविकांची नेहमीच वर्दळ असते. बालाजींच्या देखण्या मंदिराबरोबरच गोशाळा, गोउत्पादनांशी संबंधित प्रयोगशाळा या परिसरात आहे. मंदिरामध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सहाच महिन्यात मूर्तीवरील दागिने चोरीस गेले. तेव्हापासून मंदिराने सुरक्षाविषयक साधनांमध्ये वाढ केली आहे. मंदिरामध्ये गाभाऱ्यात तीन, सभामंडपामध्ये दोन आणि बाहेर तीन असे एकूण नऊ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. परंत, येथील परिसर पहाता आणखी मोठ्या प्रमाणावर सीसीटीव्हींची गरज आहे. सीसीटीव्ही बसविणे ट्रस्टच्या विचाराधीन असले तरी प्रत्यक्षात त्यांची संख्या वाढविणे अजून शक्य होऊ शकलेले नाही.मंदिराच्या आवारात लोकांना सहजगत्या दिसणार नाहीत, अशा ठिकाणी तीन सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत. लवकरच येथील सीसीटीव्हींची संख्या वाढविण्यात येईल. नेट रिमोट कनेक्टीविटी असणारे सीसीटीव्ही बसविण्याचा ट्रस्टचा प्रयत्न असून, त्यासंदर्भात काही संस्थांशी बोलणीही सुरू आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°0'19"N   73°47'31"E
  •  12 किमी.
  •  125 किमी.
  •  157 किमी.
  •  179 किमी.
  •  481 किमी.
  •  539 किमी.
  •  847 किमी.
  •  899 किमी.
  •  983 किमी.
  •  1026 किमी.
This article was last modified 10 वर्षांपूर्वी