कपालेश्वर मंदिर (नाशिक)

India / Maharashtra / Nashik / नाशिक
 शिव मंदिर  गट निवडा
 Upload a photo

रामकुंड परिसरात गोदावरीची चार-पाच मंदिरे आहेत. त्यातलेच हे एक. त्या दोन्ही तंबूंमधून जाणाऱ्या पायऱ्या कपालेश्वर मंदिराकडे जातात. या मंदिराच्या प्रवेशद्वाराची भव्य कमान दिसते. ही कमानही मधल्या काळात पडून पुरात वाहून गेली. त्याच्या जागी दुसरी कमान बांधली गेली. त्यावर आता नगारखानादेखील आहे. त्याच्या अलिकडे दोन मंदिरे दिसतात , त्यातले पहिले अजगर महादेवाचे (अजगरबाबांची समाधी) तर दुसरे हनुमानाचे मंदिर आहे. या हनुमान मंदिराशेजारी चित्रात न दिसणारे आणखी एक छोटे मंदिर आहे. हे मूलत: शंकराचे मंदिर असले तरी आतल्या भिंतीवर संगमरवरात केलेल्या गरुड , विष्णु व लक्ष्मीच्या अगदी वेगळ्या पद्धतीने घडवलेल्या नितांत सुंदर मूर्ती आहेत. या मंदिरापुढे महापालिकेचा मोठ्ठा सूचनाफलक असल्याने आतल्या मूर्ती बाहेरून सहजासहजी दिसत नाहीत. चित्रात दिसणाऱ्या अन्य रहिवासी इमारतींपैकी कपालेश्वर पायऱ्यांवरच्या गायत्री मंदिरामागची इमारत फक्त अजून आहे. बाकी साऱ्या कालौघात नाहीशा झाल्या.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°0'29"N   73°47'34"E
  •  11 किमी.
  •  125 किमी.
  •  157 किमी.
  •  179 किमी.
  •  481 किमी.
  •  539 किमी.
  •  847 किमी.
  •  899 किमी.
  •  983 किमी.
  •  1026 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी