नाशिक
India /
Maharashtra /
Nashik /
World
/ India
/ Maharashtra
/ Nashik
जग / भारत / महाराष्ट्र / नाशिक
शहर, mandal headquarter (en), district headquarter (en)
शहराचा इतिहास संग्रहीत करण्याचा प्रयत्न नाशिकमध्ये होत आहे. मात्र चांगल्या कामाला विघ्न फार , अशी स्थिती असल्याने नाशिकच्या इतिहासाचं गूढ उलगडणार तरी कधी अशी स्थिती आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर इतिहास संग्रहालयाच्या कामाला गती मिळायला हवी.
स्वा तंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर देशात असंख्य वस्तुसंग्रहालयांच्या माध्यमातून इतिहास संकलित करण्याचा प्रयत्न होत राहिला. निरनिराळ्या पंचवार्षिक योजनांमधून सरकारने वस्तुसंग्रहालये , पुरातत्त्व संशोधनाच्या जागा यांचं जतन करण्याचं धोरण मांडलं. जिल्हा आणि विभाग स्तरावर महत्त्वाच्या वास्तू , जागा , संग्रहालयं स्थापन केली गेली. अनेक कामं सुरू आहेत. त्यातील असंख्य निधीअभावी अथवा राजकारणाचा बळी ठरल्याने रखडली आहेत. आतापर्यंत स्थापन झालेली वस्तुसंग्रहालयं ही विखुरलेला इतिहास गोळा करताना दिसतात अथवा जे काही दुर्मिळ म्हणून सापडलं त्याची रवानगी संग्रहालयातील बंद कोठडीत करण्यापुरतं त्याचं अस्तित्व उरलं आहे. नाशिकच्या पुरातत्त्व विभागाचं प्रादेशिक संग्रहालयही अशाच वेदना सहन करत आहे. संग्रहालयाकडे होत असलेलं अक्षम्य दुर्लक्षामुळे इतिहासाचा वारसा सांगणाऱ्या अनेक पैलू बंद खोलीत निपचित पडून आहेत. त्यामुळेच शहराचा इतिहास मांडणारे संग्रहालय उभे राहावे ही कल्पना नाशिकमध्ये २०१०साली मांडली गेली.
नाशिक प्रदेशाच्या अस्तित्वाचा उल्लेख पुरातन काळातील पाषाण युगापर्यंत जातो. तसेच पौराणिक उल्लेखानुसार थेट रामायण काळाशी संबंध जोडता येतो. प्रभु रामचंद्रांचे मुख्यत्वे वनवासातील बारा वर्षांचे पुनित वास्तव्य नाशिक परिसरात , गोदावरीच्या काठी पंचवटीत होते. सध्याचा नाशिक जिल्ह्याचा बहुतांश भाग इ.स.१३१३ ते १३४७ या काळात देवगिरीच्या यादवांच्या अधिपत्याखाली व त्यानंतर १४९०पर्यंत बहामणी राज्याचा एक भाग होता. इ.स. १४९० ते १६३६ या काळात तो अहमदनगरच्या निजामशाहीत समाविष्ट झाला होता. छत्रपती श्री. शिवाजी महाराजांनी मुस्लिम सत्तेच्या जोखाडातून हा भाग मुक्त केला पेशवाईच्या अस्तानंतर इ.स.१८१८ पासून हा सर्व भूभाग ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली गेला. मध्ययुगात प्रशासकीयदृष्टया नाशिक जिल्ह्याचा काही भाग अहमदनगर व काही भाग खान्देश जिल्ह्यात होता. १८६९मध्ये नाशिक हा जिल्हा करण्यात आला.
संगमनेर येथील जोर्वे गाव एकेकाळी खुद्द जरासंधाची नगरी म्हणून ओळखली जाते. येथील उत्खननात सापडलेली मडकी भारतीय इतिहासाला शेकडो वर्षे मागे घेऊन जाणार ठरली. पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्वशास्त्र विभागातील संशोधक डॉ. ह. धी. सांकालिया यांना १९५०मध्ये जोर्वेतील मडक्यांवर संशोधन केल्यावर ही मडकी एका ग्रामसंस्कृतीची निदर्शक आहेत हे कळलं ; पण पुढच्या मागच्या वसाहतीचा कुठलाच मागमूस नसल्याने हे सर्व कोणत्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कालानुक्रमात हे सगळं कुठं बसवायचं , हा त्यापुढील प्रश्न नाशिकने सोडविला. नाशिकच्या उत्खननातही सातवाहनकालीन वसाहतीच्या खालच्या थरांमधे जोर्वेतील मडक्यासारखीच रंगीत , नक्षीदार खापरं आणि ग्रामसंस्कृतीचे अवशेष मिळाले.
खरंतर काही लाख वर्ष मागे जाईल इतका इतिहास नाशिकच्या भूमित घडला आहे. तो एकत्रित करावा म्हणूनच इतिहास संग्रहालयाची कल्पना पुढे आहे. नाशिककरांच्या प्रतिष्ठेचा ठरावा असा हा प्रकल्प साकारण्यासाठी महापालिकेने तयारीही सुरू केली . मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून फक्त बैठकांवर बोळवण सुरू आहे.
एखाद्या शहराचा इतिहासात तेथील पौराणिक काळ , सातवाहन काळ , अहिर , चालुक्य , यादव आणि राठोड या राजांच्या काळात बहरलेले नाशिक. अकबरापासून अल्लाऊद्दीन खिल्जीचा गुलशनाबाद , मराठा आणि पेशवा काळात नाशिकमध्ये सुंदर नक्षीकामाच्या वास्तू , ब्रिटीश काळातील जॅक्सनचा खून व स्वातंत्र्य संग्राम तसेच नाशिकमध्ये नावारूपाला आलेल्या प्रसिद्ध व्यक्ती , पेशव्यांपासून तात्यासाहेब शिरवाडकर , वसंत कानेटकर यासारख्या महनीय व्यक्तिरेखा , नाशिक जिल्ह्याचे वैशिष्ट्य असलेल्या आदिवासी समाज , नाशिकच्या परंपरा असलेले वीर , पिंगळा , वासुदेव , सहदेव भाडळी , शहरातील तेलीगल्ली , पगडबंद लेन , म्हसोबा गल्ली , गाडगीळ गल्ली यासारख्या गल्ल्यांचे नामकरण , मराठा काळात विकसित झालेल्या मिनीएचर पेंटींग्जचे (भारतीय कलाशास्त्र चित्रकला) पहायला मिळाली तर नाशिककरांसह देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण ठरेल. नाशिकची मंदिरे , घाट , वास्तू , वाडे याबरोबरच सिंहस्थ काळातील छायाचित्ररूपी पट या संग्रहालयात उलगडण्यात येणार आहे.
नाशिक शहराचे सर्वप्रथम नाव त्रिकंटक , त्यानंतर पद्मपूर , जनस्थान , नासिक्य , नवशिख , गुलशनाबाद , नासिक असा प्रवास करीत आताच्या नाशिकपर्यंतचा समग्र इतिहास येथे पाहता येणार आहे. तसेच मूर्ती , चित्र आणि हस्तलिखिताच्या माध्यमातून ६० हजार वर्षांपूर्वीच्या उपलब्ध पुराव्यांच्या आधारे शहराचा इतिहास सांगणारी वास्तू गंगापूर रोड येथील पंम्पिंग स्टेशन शेजारी साडेसहा एकरात साकारले जाणार आहे. यासाठी साधारण सहा कोटी रूपये खर्च येणार आहे. संग्रहालयाच्या तळमजल्यावर अश्मयुग , ऐतिहासिक , सातवाहन युग तसेच राठोड , अहिर , मराठा आणि पेशवे घराण्यांचा इतिहास , युग याविषयी सचित्र माहिती , तर वरच्या मजल्यावर शहरातील नावारूपास आलेल्या व्यक्तींचे छायाचित्र व माहिती , आदिवासी संस्कृती , शहरातील बाराबलुतेदारी आणि त्यावरून गल्ल्यांना पडलेली नावे , नाशिक रागमाला , नाशिकमधील अविस्मरणीय क्षण (१८९० पासून) छायाचित्रे लावण्याचे नियोजन आहे. संग्रहालयात चार डॉक्युमेंटरी दाखविण्यात येतील. त्यात पुरातन काळापासून नाशिकचा झालेला इतिहास ते आधुनिक नाशिक असा प्रवास नाशिककरांना पाहता येईल. या सर्व कामाची जबाबदारी श्री व्यास रिसर्च या संस्थेच्या दिनेश वैद्य , अनिता जोशी , देवेन कापडणीस यांच्यावर सोपवली आहे. तर इतिहास संग्रहालयाचे प्रवेशद्वार पांडवलेणीच्या या प्रवेशव्दारासारखे असेल. संग्रहालयामध्ये १२७ विविध फ्रेम्स , ३५ मूर्ती , १४७ माहिती देणाऱ्या विविध फ्रेम्स , विविध १८० पुरातन वस्तू , १४ मोठी पेंटिग्ज , एक मोठा डिस्प्ले आणि नाशिक टाइमलाइन सेक्शन या बाबींबरोबरच १८ विभाग असतील. एवढेच नव्हे तर ' नाशिकचा इतिहास ' या २३०० पानी पुस्तकावरही काम पूर्ण झाले आहे.
शिवसेना सत्तेत असताना नाशिक इतिहास संग्रहालयाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. आतापर्यंत संशोधन व इमारतीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र प्रतीक्षा आहे ती काम अंतिम स्वरूपात उभे राहण्याची. दरम्यान , सत्ताबदल झाल्यानंतर इतिहास संग्रहालयाचे काम मंदावलं. विशेष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी इतिहास संग्रहालयाचे काम पाहण्यासाठी आतापर्यंत तीनदा भेटी दिल्या आहेत. मात्र त्यानंतरही नाशिककरांचे हे स्वप्न पूर्ण होण्याच्या दिशेने काही हालचाली होताना दिसत नाहीत. महापालिका आयुक्त संजय खंदारे यांनी इतिहास संग्रहालयाचे कामकाज सुरळीत करण्याच्या दृष्टीने मधल्या काळात प्रयत्न केला मात्र राजकीय इच्छाशक्तीच्या अभावापुढे प्रशासन हतबल ठरत असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
सिंहस्थापूर्वी नाशिकचे इतिहास संग्रहालय झाले तर लाखो भाविकांसाठी दुधात साखरेचा योग्य ठरेल. शिवसेना , राष्ट्रवादी आणि मनसेने इतिहास संग्रहालयाच्या वास्तूला भेट देऊन काम मार्गी लावण्यासाठी यापूर्वी प्रयत्न केले आहेत आताही आपले राजकीय आणि सत्तेतील बळ वापरून नाशिककरांना नाशिकचा इतिहास अनुभवण्याची ऐतिहासिक संधी ते देतील , अशी आस नाशिककरांना लागली आहे.

Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 19°58'54"N 73°47'40"E
प्रतिक्रिया