श्रीभवानी किंवा जगदंबा मंदिर, टाहाकारी

India / Maharashtra / Sinnar /
 देवी मंदिर  गट निवडा
 Upload a photo

देखण्या मंदिरांच्या पंक्तीमध्ये येते ते म्हणजे टाहाकारी इथले श्रीभवानी किंवा जगदंबा मंदिर. टाहाकारी या नावाची उत्पत्ती खूप रंजक आहे. रावणाने सीताहरण केले तेव्हा सीतेने रामाच्या नावाने याच ठिकाणी टाहो फोडला. जिथे तिने टाहो फोडला ते ठिकाण टाहो करी, आणि मग टाहाकारी म्हणून प्रसिद्धीला आले असे इथे सांगितले जाते. अकोल्याच्या वायव्येला १६ कि.मी. अंतरावर असलेले हे अत्यंत देखणे, शिल्पजडित यादवकालीन मंदिर आढळा किंवा आरदळा नदीच्या काठावर वसलेले आहे. तीन गाभारे असलेले हे काहीसे निराळे मंदिर आहे. तीनही गाभाऱ्यांना एक सामायिक सभामंडप आहे. मुख्य गाभाऱ्यात वाघावर आरूढ झालेल्या अठरा हातांच्या महिषासुरमर्दिनीची लाकडी मूर्ती आहे. अत्यंत प्रसन्न आणि देखण्या अशा या मूर्तीच्या हातामध्ये विविध आयुधे दाखवलेली दिसतात. मंदिराच्या उर्वरित दोन गाभाऱ्यांमध्ये पूर्वेला महालक्ष्मी आणि पश्चिमेला महाकालीच्या सुंदर मूर्ती दिसतात. छताला मध्यभागातून खाली लोंबणारे एक दगडी झुंबर अप्रतिम आहे. मंदिराच्या बाह्य़ अंगावर अनेक अप्सरा ज्यांना सुरसुंदरी असे म्हणतात त्यांचे मोठय़ा प्रमाणावर अंकन केलेले दिसते. काही सुरसुंदरींच्या डोक्यावर छत्र दिसते तर एका सुंदरीच्या अंगामध्ये युरोपियन पद्धतीचा कोट घातलेला अगदी स्पष्टपणे दाखवलेला आहे. अत्यंत विलोभनीय अशा या सगळ्या प्रतिमा आहेत. जवळच एक पडकं देऊळ आहे. तिथे एक संस्कृत शिलालेख असून त्यामध्ये शके १०५० म्हणजेच इ.स. ११२८ असा उल्लेख सापडतो. चैत्रामध्ये देवीची मोठी यात्रा भरते, तर नवरात्रीत एकूण बारा दिवस इथे मोठा उत्सव केला जातो, ज्यात वीणा भजन हा एक आगळावेगळा कार्यक्रम सादर केला जातो. इथे मिळणारे अस्सल खव्याचे फिके पेढे आवर्जून खावेत असे असतात.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   19°38'49"N   73°56'5"E
  •  52 किमी.
  •  113 किमी.
  •  119 किमी.
  •  220 किमी.
  •  507 किमी.
  •  511 किमी.
  •  804 किमी.
  •  856 किमी.
  •  941 किमी.
  •  983 किमी.
This article was last modified 8 वर्षांपूर्वी