श्री आदिशक्ती महालक्ष्मी आंबाबाई देवस्थान श्री क्षेत्र शक्तीपीठ कोल्हापुर-करवीर (कोल्हापूर)

India / Maharashtra / Kolhapur / कोल्हापूर
 मंदीर, विशेष जागा, शक्ति पीठ

सुशोभीकरणाच्या नावाखाली महालक्ष्मी मंदिर आणि परिसराचे विद्रुपीकरण सुरू असून , गेल्या ५० वर्षांत मंदिरात ५० बदल करण्यात आले आहेत. शिल्पकलेचा अजोड नमुना असलेल्या या मंदिराची शिखरे , काही ठिकाणच्या भिंती ऑइल पेंटने रंगविल्या आहेत. मार्बल घातल्याने मंदिरातील गारवाच नाहीसा झाला आहे. अनेक ठिकाणी पक्के बांधकाम केले आहे. यातील बहुतांश बदल पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि मंदिरांच्या हक्कदारांनी केले आहेत. अनेक वर्षे या बदलांच्या विरोधात आवाज उठत असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत होते. मात्र , आता जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी दखल घेतल्यामुळे झालेल्या बदलांवर चांगलाच प्रकाश पडणार आहे. प्रमोद सावंत यांनी २००३ मध्ये देवस्थान समितीविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला होता. या अर्जावर गुरुवारी सुनावणी झाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणीचे आदेश दिले. मंदिराचे मूळ स्वरूप कायम ठेवून परिसरातील अवैध बांधकामे हटविण्याची मागणी सावंत यांनी केली आहे. १९६९ ला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीची स्थापना झाल्यानंतर परिसरात मोठे बदल होत गेले. देवीच्या पूजेचे पाणी ज्या मणिकातीर्थात जात होते , तिथे सुलभ शौचालय आणि सार्वजनिक स्वच्छतागृह बांधले आहे. प्रदक्षिणा मार्गावरील मार्बल काढून मंदिराला मूळ स्वरूप आणण्याचा प्रयत्न समितीने केला , पण अन्य ठिकाणचा मार्बल काढलेला नाही.
असे केले बदल...मुख्य मंदिराची शिखरे आणि काही मूर्तींसह छोट्या मंदिरांनाही ऑईल पेंट.
चारही प्रवेशद्वारांसमोर ग्रील , हायमास्क दिवे , प्रदक्षिणेसाठी ग्रील ,
रामाच्या पाराला सरंक्षक कठडा , पूर्व दरवाजात उड्डाण पूल. जागोजागी दक्षिणा पेट्या ,
देवस्थान समिती कार्यालय , पोलिस चौकी , आयसीआयसीआय बँकेचा कक्ष , प्रसाद वाटप कक्ष , ग्राहक सेवा केंद्र , दत्त मंदिराजवळील दुकाने , चांदीच्या रथासाठी उभारलेले शेड , लॉटरी सेंटर ही आवारातील नवीन अतिक्रमणे.
शनी मंदिराचे जुने जाळीचे बांधकाम बदलले ,महालक्ष्मी यंत्रावर काचेची पेटी ,मंदिराच्या शिखरावरील मातृलिंगाच्या मंदिरातील तीन खोल्या बुजवल्यामंदिराच्या चारही बाजूंच्या सरंक्षक भिंतीच्या कडेने हाराची दुकाने , चप्पल स्टँड.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   16°41'41"N   74°13'22"E
  •  218 किमी.
  •  307 किमी.
  •  379 किमी.
  •  439 किमी.
  •  515 किमी.
  •  533 किमी.
  •  542 किमी.
  •  614 किमी.
  •  688 किमी.
  •  743 किमी.
This article was last modified 9 वर्षांपूर्वी