पोहरादेवी मंदिर

India / Maharashtra / Digras /
 देवी मंदिर  गट निवडा

पोहरादेवी ही संत सेवालाल महाराज, आई जगदंबा यांची पावनभूमी आहे. यांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पोहरादेवीला येतात. पण, पोहरादेवीला येण्यासाठी साधा रस्ता नाही. पिण्यासाठी पाणी नाही. बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवीची ही स्थिती आहे, अशी खंत बंजारा समाजाचे गु‌रू रामराव महाराज यांनी व्यक्त केली आहे.

रामराव महाराज म्हणाले, पोहरादेवीला जोडणारे सर्व रस्ते श्रमदानातून बांधण्यास तयार आहोत. पण, परवानगी दिल्या जात नाही. वादाचे कारण प्रशासन पुढे करते. कर्नाटकमधील सुवर्ण गोंडणकापा या संत सेवालाल महाराज यांच्या जन्मभूमीवरूनही वाद होते. पण, माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी यात लक्ष घातले. संत सेवालाल महाराज व देवीची दीड कोटींची मंदिरे बांधली. पोहरादेवीबाबत सरकारमध्ये अशी इच्छा दिसत नाही. युती सरकारने सहा कोटी रुपये मंजूर केले आहेत. यापूर्वी आघाडी सरकारने २१ कोटींचा विकास आराखडा तयार केला होता. पण, यातून पोहरादेवीचा विकास झाला का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. वाशीम जिल्हाच नव्हे तर संपूर्ण पश्चिम विदर्भाची आर्थिक प्रगती या संस्थानच्या विकासाने होऊ शकते
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°6'31"N   77°37'49"E
  •  286 किमी.
  •  411 किमी.
  •  442 किमी.
  •  498 किमी.
  •  527 किमी.
  •  767 किमी.
  •  860 किमी.
  •  868 किमी.
  •  932 किमी.
  •  993 किमी.
This article was last modified 9 वर्षांपूर्वी