राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थान (नीरी), (नागपूर)

India / Maharashtra / Nagpur / नागपूर
 कार्यालय, scientific research institute / centre (en), fenced area (en)
 Upload a photo

नागपूर, ३ एप्रिल
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी
संशोधन संस्थान (नीरी) मध्ये
आयोजित आंतरराष्ट्रीय
संमेलनादरम्यान पार पडलेल्या
कविसंमेलनाने रंगत आणली.
‘पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकनाच्या
नव्या दिशा' या विषयासंदर्भातील हे
आंतरराष्ट्रीय संमेलन तीन दिवस नीरीत
पार पडले. यावेळी सांस्कृतिक
कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात
आले.
कविसंमेलनात प्रा. मधुप पांडेय,
डॉ. नीरज व्यास, अ‍ॅड. राधेश्याम
महेंद्र, शशिकला दुबे, व डॉ. सागर
खादीवाला यांनी कविता सादर केल्या.
डॉ. खादीवाला हे कविसंमेलनाचे
समन्वयक होते. नीरीचे प्रमुख वैज्ञानिक
डॉ. जयशंकर पांडेय यांनी पाहुण्यांचे
स्वागत केल,े तर संचालक डॉ. सतीश
वटे यांनी स्मृतिचिन्हासह पाहुण्यांचा
सत्कार केला. संचालन जी. आर. प्रभा
यांनी केले, तर डॉ. जय शंकर पांडेय
यांनी आभार मानले.
मुख्य वैज्ञानिक डॉ. डी. एस.
रामटेके, प्रशासन अधिकारी श्रीधर
खिस्ते, यु. एम. टाकळीकर व सौरभ
मुळे यांचे कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी
सहकार्य लाभले.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   21°7'22"N   79°4'17"E
This article was last modified 12 वर्षांपूर्वी