नागपूर मध्यवर्ती कारागृह (नागपूर)

India / Maharashtra / Nagpur / नागपूर
 तुरुंग  गट निवडा
 Upload a photo

नागपूर-वर्धा मार्गावरील शहराच्या मध्यभागी असलेले १५१ वर्षांपूर्वीचे नागपूर मध्यवर्ती कारागृह आता कामठी तालुक्यात जाणार आहे. महालगाव, ओसली आणि दिघोरी येथील ४३.६ हेक्टर जागा कारागृहासाठी आरक्षित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कारागृहाच्या बाजुला जिल्हा न्यायालयासाठीही ६.३ हेक्टर जागा आरक्षित ठेवण्यात आली आहे.१८६४ मध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृह सुरू करण्यात आले. तेव्हा या ठिकाणी दाट वस्ती नव्हती. वाढती लोकसंख्या आणि नागपूरच्या विस्तारामुळे आज नागपूर मध्यवर्ती कारागृह शहराच्या मधोमध आले आहे. १२५ एकर जागेवर हे कारागृह आहे. त्यामुळे आजची गरज लक्षात घेता एवढी मोठी जागा आणि शहराच्या मधोमध कारागृहासाठी गुंतवीणे विकासाच्या योजना आखताना सुसंगत नसल्याने हे कारागृहच आता स्थानांतरीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागपूर महानगर प्रारूप विकास आराखड्यात नव्या कारागृहासाठी जागा आरक्षित करण्यात आली आहे.नागपूर मध्यवर्ती कारागृहात २८ बरॅक्स आहेत. महिला विभागासठी स्वतंत्र विभाग आहे. एक अंडा सेल आहे. कैद्यांना व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची सुविधाही या कारागृहात निर्माण करण्यात आली आहे. कारागृहाचा हा संपूर्ण डोलारा आता महालगाव, ओसली आणि दिघोरी येथील १०९ एकरवर वसविण्यात येणार आहे. न्यायालय आणि कारागृह जवळजवळ वसविण्याची योजना असल्याने यंत्रणेवरील ताणही कमी होईल हा विचारही यामागे ठेवण्यात आला आहे. न्यायालयात कैद्यांना सादर करावे लागते, त्यावेळी पोलिस बंदोबस्ताची गरज पडते. कारागृह स्नानांतरित झाल्याने हा ताणही कमी होणार आहे.नागपूर महानगर प्रारूप विकास आराखड्यात ३७ प्रकारच्या सुविधा निर्माण करण्यासाठी ६४१ ठिकाणी आरक्षणे निर्धारित करण्यात आली आहेत. यासाठी मेट्रो रिजनमधील एकूण १ हजार ९३५ हेक्टर जागेची गरज आहे. नागपूर शहराचा विकास नियोजन पद्धतीने व्हावा हा यामागील उद्देश असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   21°7'30"N   79°4'39"E
This article was last modified 10 वर्षांपूर्वी