पारोळा किल्ला (भुईकोट किल्ला) (पारोळा)

India / Maharashtra / Parola / पारोळा
 तटबंदी  गट निवडा
 Upload a photo


www.youtube.com/watch?v=c8re2KXESUQ

पारोळा - हा किल्ला 1727 मध्ये जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी बांधला. किल्ल्याभोवती चारही बाजूला खोल खंदक आणि पूर्वेकडे विस्तीर्ण तलाव बांधला आहे. पावणेतीन शतके उलटूनही या तलावाची स्थिती चांगली आहे. सपाट मैदानावर बांधलेल्या या भुईकोट किल्ल्याची लांबी 525 फूट; तर रुंदी 435 फूट आहे. वास्तुशास्त्राचा एक सुंदर नमुना म्हणून या किल्ल्याकडे पाहिले जाते. पारोळा शहरालाही चारही बाजूंनी तटबंदी आहे. एकूण सात दरवाजे असून, दिल्ली दरवाजा हा पूर्वेकडील मुख्य दरवाजा आहे. धरणगाव दरवाजा, वंजारी दरवाजा, अमळनेर दरवाजा, पीर दरवाजा अशी अन्य प्रवेशद्वारांची नावे आहेत
जवळपास तीनशे वर्षांपूर्वी किल्ल्याची उभारणी करताना पारोळा गावाची निर्मिती झाल्याची नोंद इतिहासात आहे. किल्ल्याचे साधारणत: तीन प्रकार पडतात. त्यात स्थलदुर्ग, गिरिदुर्ग आणि जलदुर्ग हे मुख्य प्रकार आहेत. त्यातील जमिनीवरील म्हणजेच स्थलदुर्ग अथवा भुईकोट किल्ला. या परिसरात त्या काळात पेंढाऱ्यांची जवळपास ५० घरे होती. त्यांची ओळख म्हणून आजही या गावातील एका भागाची ओळख 'पेंढारपुरा' म्हणून आहे. जहागीरदार हरी सदाशिव दामोदर यांनी भुईकोट किल्ला इ. स. १७२७मध्ये बांधल्याची नोंद आहे. जळगाव जिल्ह्यातील जुन्या सुंदर वास्तूत या किल्ल्याची गणना केली जाते.
किल्ल्यातील ' सात दरवाजे '
पारोळा बसस्थानकापासून पाच मिनिटांच्या अंतरावर किल्ला असल्याने तुम्ही पायी किल्ल्यापर्यंत पोहोचू शकतात. बाजारपेठेतूनच किल्ल्यात जाण्याचा मार्ग आहे. या मार्गातील खंदकावर पूल असून, पुढे दरवाजा आहे. सध्या किल्ल्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे खंदकावरून जाणाऱ्या मार्गावरील मुख्य दरवाजा नवीन बसविण्यात आला आहे. या गावाला चारही बाजूंनी तटबंदी होती. या तटबंदीला सात दरवाजे होते. त्यातील पूर्वेकडील दरवाजास ' दिल्ली दरवाजा ' म्हणून ओळखले जाते, तर अन्य दरवाजांची नावे वेगळी आहेत. आताच्या काळात या परिसरातीलच काही गावांची अथवा समाजाची नावे या दरवाजांना देण्यात आली आहे. त्यात धरणगाव दरवाजा, वंजारी दरवाजा, पीर दरवाजा व अमळनेर दरवाजा अशी ही नावे आहेत.
बालेकिल्ला
किल्ल्यामध्ये दगडी बांधकामाचा मजबूत भाग आहे. त्याला बालेकिल्ला असे म्हणतात. अन्य भुईकोट किल्ल्यांप्रमाणे या किल्ल्याची बांधणी रेखीव आहे. तो साधारण १६० मीटर लांब व १३० मीटर रुंद आहे. किल्ल्याच्या मध्यभागी मुख्य किल्ला अर्थात बालेकिल्ला दिसून येतो. या बालेकिल्ल्याला चार गोलाकार भव्य बुरूज आहेत. त्यांची उंची साधारणत: पंचवीस फूट असावी. इंग्रजांनी या ठिकाणी काही संपत्ती सापडेल, या लालसेने खोदकाम केले होते. म्हणून या बुरुजांचे आतील बाजूचे सौंदर्य नष्ट झाले आहे. किल्ल्याच्या वरच्या भागावरून पूर्ण किल्ल्याचे चोहोबाजूंनी दर्शन घेता येते. सध्या या ठिकाणाची निगा पुरातत्त्व विभाग घेत असल्याने अनेक ठिकाणी पुनर्बांधणीची कामे सुरू झाली आहेत. किल्ल्याच्या आत काही विहिरी आहेत. येथील एका भव्य बुरुजाच्या आतील भाग झाडामुळे ढासळला आहे. किल्ल्यात एका कमानीजवळ चौकोनी विहीर आहे. त्यात पावसाळ्यात बऱ्यापैकी पाणीसाठा होतो.
चौफेर होते खंदक
पूर्वेकडच्या तटबंदीच्या बाहेरच्या बाजूस एक खंदक आहे. आता त्याला येथील स्थानिक लोक तलाव म्हणतात. पूर्वीच्या काळात किल्ल्याच्या चौफेर खंदक असल्याचे सांगितले जाते. शत्रूने किल्ल्यात प्रवेश करू नये यासाठी खंदकात मगर आणि विषारी प्राणी सोडले जात. त्यामुळे पाण्यातून किल्ल्यात प्रवेश करणे शक्य नसे. सध्या या तलावाच्या काठावर अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे किल्ल्याबाहेरून खंदक दिसत नाही. आतल्या बाजूने पाहिल्यास मात्र त्यावर बाटल्या व इतर प्लास्टिकचा कचरा तरंगताना दिसतो.
महादेवाचे मंदिर
किल्ल्यामध्ये महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. त्याला सध्या रंगरंगोटी करण्यात आली आहे. येथे एका भुयाराचे तोंड आहे. हे भुयार येथून आठ किलोमीटर दूर असलेल्या नागेश्वर मंदिराजवळ निघते, असे सांगितले जाते. हे भुयार घोडेस्वार जाऊ शकेल एवढ्या उंचीचे आहे. याच भुयाराचा वापर राणी लक्ष्मीबाईने पारोळ्यातून बाहेर पडण्यासाठी केला होता, असे म्हटले जाते; परंतु त्याबद्दल अधिकृत अशी माहिती मिळत नाही. वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना वास्तुशास्त्राचा एक उत्तम नमुना म्हणूनही या किल्ल्याकडे पाहता येईल. झाशीच्या राणीच्या वास्तव्याने हा किल्ला तिनेच बांधला, अशीही स्थानिकांची समजूत आहे. राणीच्या माहेरचे वंशच म्हणजेच तांबे घराणे आजही पारोळा गावात राहतात. पारोळ्याचा हा किल्ला जळगाव जिल्ह्यातील एक सुंदर ठिकाण आहे; परंतु स्थानिकांनी केलेल्या अतिक्रमणाने त्याचे सौंदर्य धोक्यात आले आहे. पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्या माध्यमातून किल्ल्याची जपणूक व सौंदर्यात भर टाकण्यासाठी निधी मिळविण्यात आला आहे. त्या माध्यमातून या परिसरात जॉगिंग ट्रॅक, बगिचा आणि नाट्यगृह उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, स्थानिक नागरिकांनीदेखील या ऐतिहासिक किल्ल्याची निगा राखणे तितकेच महत्त्वाचे आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°52'38"N   75°6'57"E

प्रतिक्रिया

  • parolyat killyachi durdasha zali aahe karan tyala nagar parishad , Polisyantrana, aani Nete aahet. tasech tethil netyancha kahi ek sahbhag ahe to fakt nidhi milava ya karita ahe.pudhe kahi kaam karatanna disat nahi.
  •  173 किमी.
  •  252 किमी.
  •  292 किमी.
  •  293 किमी.
  •  490 किमी.
  •  586 किमी.
  •  886 किमी.
  •  958 किमी.
  •  1060 किमी.
  •  1063 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी