अचला-गड

India / Maharashtra / Surgana /
 डोंगरी किल्ला  गट निवडा
 Upload a photo

पिंपरी-अचला हे किल्ल्याच्या पायथ्याचं गाव.
गावच्या उत्तरेलाच समुद्रसपाटीपासून १२५० मीटर उंचीचा अचलाचा किल्ला दिसतो. किल्ल्याच्या पश्चिम अंगाला त्रिकोणी आकाराचा तवल्या डोंगर आपलं लक्ष वेधून घेतो. पूर्वपश्चिम पसरलेला अचला किल्ल्याच्या पूर्वेकडे एक लहानशी खिंड दिसते. या खिंडीमधून अचलावर जाण्याचा सोयीचा मार्ग आहे. गडावर पोहोचेपर्यंत वाटेत पाणी नाही. म्हणून गावातूनच पाणी सोबत नेणं सोयीचं आहे. गावातून अर्ध्या-पाऊण तासात आपण खिंडीत पोहोचतो. खिंडीतून डावीकडे (पश्चिमेकडे) जाणाऱ्या वाटेनं चढाई सुरू केल्यावर आपण अचलाच्या कड्याजवळ पोहोचतो. अचलाचा माथा डावीकडे ठेवून आपण त्याच्या उत्तरअंगाला येतो.
अचलाच्या उत्तरअंगाला येऊन पश्चिमेकडे चालत गेल्यावर एका घळीतून माथ्यावर जाण्याचा मार्ग आहे. या मार्गाशिवाय अन्य बाजूनं अचलागडावर जाण्यासाठी मार्ग नाही. अचला गडाच्या माथ्यावर पोहोचेपर्यंत साधारण दोन तास तरी लागतात. अचलागडाचा डोंगर चारही बाजूनं ताशीव असल्यामुळे गडाला संरक्षणाच्या दृष्टीनं फारश्या तटबंदीची आवश्यकता नाही. गडाचा उत्तर भाग बंदिस्त केल्यास गडाचं संरक्षण होऊ शकतं. गडावर गड असल्याच्या तुरळक खाणाखुणा आपल्याला पाहायला मिळतात. अचलागडापासून तवल्या उत्तम दिसतो. सापुतारा व हातगड उत्तरेकडे दिसतात. दूरवर साल्हेर सालोरा तसेच कंडाण्याचे दर्शन होते. पूर्वेला सातमाळा रांगेतील अहिवंत, सप्तश्रृंगी, धोपड इत्यादी किल्ले तसेच रामसेज, देहेरही दिसतात. या गडदर्शनासाठी अर्धा तास पुरतो. पुन्हा आल्यावाटेनंच खाली उतरून खिंड गाठावी लागते. या खिंडीतून अहिवंतगडाला जाता येतं. अथवा पुन्हा पिंपरी अचला गाठून परतीच्या मार्गाला लागता येतं.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°25'52"N   73°48'53"E
  •  43 किमी.
  •  147 किमी.
  •  164 किमी.
  •  204 किमी.
  •  466 किमी.
  •  561 किमी.
  •  888 किमी.
  •  943 किमी.
  •  1029 किमी.
  •  1067 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी