किल्ले तोरणागड

India / Maharashtra / Dehu Road /
 तटबंदी, डोंगरी किल्ला, bastion (fortification part) (en)

या गडावर पूर्वी तोरण जातीची झाडे जास्त होती म्हणून याला तोरणा असे नाव मिळाले असे म्हटले जाते. याशिवाय हा गड जिंकत शिवरायांनी स्वराज्याचे तोरण लावले असाही एक मोठा गैरसमज समाजात रूढ आहे, पण खरेतर शिवरायांनी तोरणा घेण्यापूर्वीच रोहिडा, कोंढाणा जिंकत स्वराज्याची घौडदौड सुरू केलेली होती.
झुंजार माची, बुधला माची आणि दोन्हीच्या मधोमध उंचीवरचा बालेकिल्ला हे तोरण्याचे स्वरूप! बिनी दरवाजा आणि त्यापाठोपाठच्या कोठी दरवाजातून आपण बालेकिल्ल्यात शिरतो. किल्ल्यावर जाताना थेट बालेकिल्ल्यातील प्रवेश हेही तोरण्याचे वैशिष्टय़ आहे.
आत शिरताच समोर दोन टाक्या दिसतात. तोरण आणि खोकड अशी त्यांची नावे. इथेच तटावर तोरणजाईच्या घुमटी आहेत. इथे यायचे आणि तोरण्याच्या 'त्या' इतिहासात शिरायचे.
.. इसवी सन १६४७चा तो प्रसंग! स्वराज्य स्थापनेचे स्वप्न घेऊन शिवराय इथे तोरण्याच्या पायी अवतरले होते. गड विजापूरच्या बादशाहकडे, पण किल्लेदार मराठा! त्याला बोलावणे पाठवले गेले. त्या रात्री राजांनी त्याला काय सांगितले हे त्या काळ आणि काळोखालाच ठाऊक . पण दुसऱ्या दिवशी सकाळी गडावरचे बादशाही निशाण खाली उतरले आणि मराठी जरीपटका फडकू लागला. राजे विजयी मुद्रेने गडावर आले. गड स्वराज्यात आला. दुरुस्तीचे आदेश सुटले आणि त्या दुरुस्तीतच एकाजागी मोहरांनी भरलेले २२ हंडे मिळाले. स्वराज्यासाठी हा दुसरा शुभसंकेत! मग त्याच जागी या तोरणजाईची स्थापना झाली आणि या संपत्तीतून शेजारच्याच मुरुंबदेवाच्या डोंगरावर स्वराज्याची राजधानी राजगड आकारास आली. शिवकाळातील हे असे भारावलेले प्रसंग आठवायचे आणि गडदर्शनास निघायचे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°16'17"N   73°37'4"E
  •  38 किमी.
  •  122 किमी.
  •  200 किमी.
  •  346 किमी.
  •  494 किमी.
  •  572 किमी.
  •  692 किमी.
  •  728 किमी.
  •  801 किमी.
  •  868 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी