दुर्ग धोडप

India / Maharashtra / Chandvad /
 डोंगरी किल्ला  गट निवडा
 Upload a photo

दुर्ग धोडप हे सह्याद्रीतलं अलौकिक रत्न. कितीही वेळा या दुर्गाची वारी केली, तरी मन भरत नाही. यावेळची धोडपवारी वैशिष्ट्यपूर्ण ठरली, ती या दुर्गावरील शेंडीच्या क्लाइंबिंगमुळे.नाशिक जिल्ह्यातली सातमाळ डोंगररांग ही डोंगर भटक्यांची आवडती. याच डोंगररांगेत दुर्ग धोडप हा जणू काही आपले दंड थोपटून एखाद्या पहिलवानासारखा उभा आहे. स्वत:चं रांगडं व्यक्तीमत्त्व असणारा हा किल्ला त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे नेहमीच लक्षवेधी ठरला आहे. शनिवारी पहाटे साडेपाचच्या दरम्यान गडपायथ्याचं हट्टी हे गाव गाठलं. साहित्य वाटणी केली आणि गडचढाई सुरू झाली. पाठीवर असलेलं वजन आणि खडी चढाई आमची परीक्षा पाहात होती. साडेआठला सोनार माचीवर पोहोचलो.आम्ही धोडप शेंडीच्या पोटात असलेल्या गुहेत पोहोचलो. टोमॅटोची भाजी आणि पोळी हा दुपारचा जेवणाचा बेत होता.जेवण केल्यावर विकास, अजय, अजीज आणि आदित्य धोडप शेंडीच्या रोप फिक्सिंगसाठी पुढं गेले. संध्याकाळी पावणेसहा वाजता चौघे सगळा सेटअप लावून खाली आले. दुसऱ्या दिवशी विकास कडूसकर, अजीज शेख आणि अजय मोरे या अनुभवी कातळरोहकांचं शेंडीवर पाऊल पडलं. परत आल्यावर विकासच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसत होतं. त्याला खूप आनंद झाल्याचं दिसत होतं. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास कडाक्याची थंडी मी म्हणत होती. थंडी आणि बोचरा वारा कुणालाही जुमानत नव्हता. आम्ही जागे झाल्या-झाल्या चहा बनवायला सुरुवात केली. चहा नाश्ता झाला आणि सगळेजण क्लायम्बिंग बेसला जाऊन पोहोचलो. धोडप शेंडीचं क्लायम्बिंग बेस (पायथा) हा गुहेपासून साधारण वीस मिनिटांच्या अंतरावर होता. पहिला टप्पा ५० फूट सोपा, दुसरा टप्पा ५० फूटांची सोपी स्क्री, तिसरा टप्पा १६५ फूटांची सोपी स्क्री आणि अंतिम टप्पा ६५ फूट सोपी स्क्री असं चढाईचं गणित होतं. मी सगळ्या सदस्यांना हार्नेस आणि स्लिंग बांधण्याच्या भूमिकेत होतो. सगळे हळूहळू दुसऱ्या स्टेशनपर्यंत जाऊन पोहोचले. मी शेवटचा शिलेदार असल्यानं सगळं साहित्य काढून हळूहळू वर जात होतो. विकास पहिल्या स्टेशनला बिले देत होता. चढाई तशी सोपी होती; पण जोरदार आणि बोचऱ्या वाऱ्यामुळे तोल जातो, की काय असं वाटत होतं. पहिलं स्टेशन झालं, की थोडं दहा फूट आडवं जाऊन आदित्य चेंजओव्हरला थांबला होता. आता दुसरा टप्पाही तसाच; पण सगळी स्क्री (घसारा) होती. अजयनं रोप फिक्स करून ठेवला होता. दुसरा टप्पा तसा सोपा होता. आता तिसऱ्या टप्प्यावर १६५ फूटांचं चालणं होतं. घसारा मात्र प्रचंड होता. अंतिम टप्पा ६५ फूट, थोडासा ओव्हरहँग (अंगावर येणारा कडा) पद्धतीचा होता. इथं सगळ्यांनाच थोडा वेळ लागला. अखेर अंतिम टप्प्यावरचा घसारा पार करत एका अविस्मरणीय, अद्भुत, आणि विलक्षण माथ्यावर येऊन पोहोचलो.शेंडीवर सगळ्यांत शेवटी मी पोहोचलो. सगळेच आनंदात होते. धोडप मान उंचावून ताठ उभा होता. धोडपची माची वरून अफलातून दिसत होती. याचसाठी केला होता सगळा अट्टाहास. सगळे सदस्य वर पोहोचून लगेच सरसरत खाली उतरत होते; कारण माथ्यावर केवळ सात ते आठजण उभे राहातील एवढीच जागा होती. उतरायला थोडा काळोखच झाला.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°23'5"N   74°1'43"E
  •  50 किमी.
  •  168 किमी.
  •  173 किमी.
  •  201 किमी.
  •  489 किमी.
  •  540 किमी.
  •  874 किमी.
  •  931 किमी.
  •  1019 किमी.
  •  1053 किमी.
This article was last modified 10 वर्षांपूर्वी