साल्हेरचा किल्ला | शिखर, तटबंदी, डोंगरी किल्ला

India / Gujarat / Ahwa /
 शिखर, तटबंदी, डोंगरी किल्ला

साल्हेर हा महाराष्ट्रातला सर्वांत उंच किल्ला आहे. उंची ५१४१ फूट (१५६७ मीटर) आहे. सालोटा हा तिसरा उंच किल्ला असून उंची ४९८६ फूट आहे.

साल्हेरचा किल्ला सटाण्याच्या पश्चिमेला आहे. अंदाजे ३५ ते ४० कि. मी. अंतरावर असलेल्या साल्हेर किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन गाडीमार्ग आहेत. एक ताहराबाद-मुल्हेरकडून वाघांबे या पायथ्याच्या गावापर्यंत जातो. तर , दुसरा मार्ग सटाणे-तिळवणकडून साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या साल्हेर गावापर्यंत जातो. वाघाम्बे गावातून जाणारा रस्ता हा थोडा अवघड असला तरी कमी वेळात आपण किल्ल्यावर पोहोचतो. या वाटेनं गेल्यास सालोटा किल्ला पण करता येतो. सामान जास्त असेल , तर किंवा सालोटा किल्ल्यावर जाताना सामान घेऊन न जाता साल्हेर सालोटा मधल्या खिंडीमध्ये ठेवून जायचं असेल तर २०० रुपये देऊन गावातून माणूस येऊ शकतो. सालोटा किल्ल्यास दोन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा दरड पडल्यामुळे जवळपास बंद होण्याच्या मार्गावर आहे. कातळ खोदून केलेल्या वाटा जास्त उंचीच्या असल्याने सुमारे एका तासात आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातात. या किल्ल्याचा पूर्वी साठवणीसाठी उपयोग होत असावा. इथं पाणी मात्र नाहीये. इथून दिसणारं साल्हेर किल्ल्याचं पिरॅमिडसारखे रूप डोळ्यात भरतं. साल्हेर किल्ला सह्याद्रीतलं कळसूबाई नंतरचं दुसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे.सालोटा उतरून खिंडीत आल्यावर , तिथून आपण चार ते पाच तासात साल्हेर किल्ल्यावर मुक्कामी जाऊ शकतो. साल्हेरवर जाण्याच्या मार्गात अनेक गुहा आणि पाण्याची टाकी दिसतात. किल्ल्यावर दोन गुहा असून राहण्यासाठी योग्य आहेत. किल्ल्यावर पाण्याच्या टाक्या असून गुहेच्या समोरच गंगासागर तलाव आहे. या किल्ल्यावरचं सर्वात बघण्यासारखं ठिकाण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच असं परशुराम मंदिर. गुहेपासून ४५ मिनिटे चालून गेल्यावर छोटी टेकडी दिसते. त्यावर हे मंदिर बांधलेलं आहे. तिथून आजूबाजूच्या परिसराचं विहंगम दृश्य आपले डोळे दिपवून टाकतं. थंड गार वारा , महाराष्ट्रातील सर्वात उंच असं मंदिर , तिथून दिसणारा सालोटा , सूर्यास्ताला पश्चिमेकडे येणारी केशरी झळाळी , क्षितिजावर लुप्त होणारा सूर्य. केवळ अप्रतिम असा अनुभव. या किल्ल्याच्या दोन्ही वाटांनी जाताना प्रत्येकी ६ दरवाजे लागतात. वाटेत प्रवेशद्वाराजवळ कोरलेले शिलालेख , दगडात कोरलेले गणपती , कातळात कोरलेल्या पायऱ्या आणि बुलंदी असे बुरूज अन तटबंदी आपल्याला इतिहासाची साक्ष देतात. वाघाम्बे गावातून चढाई करून दुसऱ्या दिवशी साल्हेरवाडी गावातून उतरावं. वाघाम्बे गावातून पश्चिमेकडून चढाई असल्यानं उन्हाचा त्रास होत नाही. येथे पाहण्यासारखे अनेक स्पॉट असल्यानं जास्त वेळ हाताशी ठेवावा. एकूणच बागलाणचे शिलेदार तुम्हाला खूप अविस्मरणीय अनुभव देतील एवढं मात्र नक्की.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°43'20"N   73°56'28"E
  •  78 किमी.
  •  140 किमी.
  •  199 किमी.
  •  238 किमी.
  •  470 किमी.
  •  569 किमी.
  •  912 किमी.
  •  969 किमी.
  •  1058 किमी.
  •  1091 किमी.
This article was last modified 10 वर्षांपूर्वी