सालोटा किल्ला

India / Gujarat / Ahwa /
 डोंगरी किल्ला  गट निवडा

साल्हेरचा किल्ला सटाण्याच्या पश्चिमेला आहे. अंदाजे ३५ ते ४० कि. मी. अंतरावर असलेल्या साल्हेर किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी दोन गाडीमार्ग आहेत. एक ताहराबाद-मुल्हेरकडून वाघांबे या पायथ्याच्या गावापर्यंत जातो. तर , दुसरा मार्ग सटाणे-तिळवणकडून साल्हेर किल्ल्याच्या पायथ्याला असलेल्या साल्हेर गावापर्यंत जातो. वाघाम्बे गावातून जाणारा रस्ता हा थोडा अवघड असला तरी कमी वेळात आपण किल्ल्यावर पोहोचतो. या वाटेनं गेल्यास सालोटा किल्ला पण करता येतो. सामान जास्त असेल , तर किंवा सालोटा किल्ल्यावर जाताना सामान घेऊन न जाता साल्हेर सालोटा मधल्या खिंडीमध्ये ठेवून जायचं असेल तर २०० रुपये देऊन गावातून माणूस येऊ शकतो. सालोटा किल्ल्यास दोन दरवाजे आहेत. पहिला दरवाजा दरड पडल्यामुळे जवळपास बंद होण्याच्या मार्गावर आहे. कातळ खोदून केलेल्या वाटा जास्त उंचीच्या असल्याने सुमारे एका तासात आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातात. या किल्ल्याचा पूर्वी साठवणीसाठी उपयोग होत असावा. इथं पाणी मात्र नाहीये. इथून दिसणारं साल्हेर किल्ल्याचं पिरॅमिडसारखे रूप डोळ्यात भरतं. साल्हेर किल्ला सह्याद्रीतलं कळसूबाई नंतरचं दुसऱ्या क्रमांकाचं शिखर आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°43'22"N   73°57'19"E
  •  78 किमी.
  •  142 किमी.
  •  200 किमी.
  •  238 किमी.
  •  471 किमी.
  •  568 किमी.
  •  911 किमी.
  •  969 किमी.
  •  1058 किमी.
  •  1090 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी