वर्धा मार्गावरील मनपाच्या खापरी जकात नाक्याचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण करण्यात येत आहे

India / Maharashtra / Nagpur / राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 7 (वाराणसी कन्याकुमारी)
 Upload a photo

जकात नाक्याबाहेरील वाहनांच्या गर्दीमुळे अनेकांचे जीव गेले आहेत . त्यामुळे नाक्यांवरील गर्दी कमी करण्यासाठी जागा संपादित करा . प्रसंगी संबंधि ‌ तांशी चर्चा करून मार्ग काढला जावा . जेणेकरून लोकांचे प्राण वाचतील , असे प्रतिपादन भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केले . मनपाच्या खापरी नाका क्र . ८ च्या विस्तारीकरण व आधुनिकीकरणांतर्गत भूम ‌ िपुजन कार्यक्रमानंतर ते बोलत होते .

गडकरी म्हणाले , नाक्याच्या कामाचा दर्जा उत्तम असावा . त्या ठिकाणी उत्तम व्यवस्था असावी . नाक्याचे अत्याधुनिकीकरण होत असल्याने ट्रक नाक्याचे काम तातडीने मार्गी लागाववे . नाक्याप्रमाणेच आरोग्याकडेही विशेष लक्ष द्यावे याकडे लक्ष वेधत भाजी मार्केट , मटन मार्केट आदींचीही योग्य व्यवस्था करावी . शहर बस वाहतुकीसाठी जागा मिळविण्याचे प्रयत्न करावेत , अशी सूचनाही त्यांनी केली .

शहरातील कामांची माहिती घ्यायला राज्यातील अनेक शहरांचे महापौर येत असल्याकडे महापौर प्रा . अनिल सोले यांनी लक्ष वेधले . येत्या काही दिवसात पारडी नाक्याचे आधुनिकीकरण करण्याचाही मानस ओह . यासंदर्भात जागेच्या मालकीचा वाद सर्व संबंध ‌ िताना बोलावून दूर करण्यात येईल . हा प्रकल्प वाणिज्य उपक्रम असून जनतेच्या कल्याणासाठी असल्याने नाममात्र भाड्यावर ही जागा लीजवर मिळण्यासाठी पाठपुरावा करावा , अशी विनंती गडकरी यांना केली . आयुक्त श्याम वर्धने यांनीही जकात नाक्याच्या विशेषतांची माहिती दिली . स्थायी समिती अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी नाक्याची लीज ११ महिन्याऐवजी स्थायी करावी , अशी मागणी केली . कार्यक्रमाला आमदार देवेंद्र फडणवीस , आमदार सुधाकर देशमुख , उपमहापौर संदीप जाधव , सत्ता पक्षनेते प्रविण दटके , नगरसेवक अस्लम खान , अपक्ष नेते मुन्ना पोकुलवार , जकात समिती अध्यक्ष किशोर डोरले , झोनचे सभापती गोपाल बोहरे , सुमित्रा जाधव , स्वाती आखतकर , महिला व बालकल्याण समिती अध्यक्ष मनीषा कोठे , शिक्षण समिती अध्यक्ष अविनाश ठाकरे , उपनेतेद्वय मुन्ना यादव व निता ठाकरे , नागपूर पं . स . सभापती अजय बोढारे , पं . स . सदस्या रेखा मसराम , आदी उपस्थित होते .

प्रास्ताविक कार्यकारी ​ अभियंता आर . एस . होतवानी यांनी केले . मान्यवरांचे स्वागत जकात समितीचे सहाय्यक आयुक्त मिलींद मेश्राम यांनी केले . कार्यक्रमाला नगरसेवक सर्वश्री संदीप जोशी , प्रा . गिरीश देशमुख , रमेश सिंगारे , डॉ . छोटू भोयर , बंडू राऊत , नगरसेविका सरीता नांदूरकर , शितल घरत , सत्यभामा लोखंडे , मनीषा गवरे , जयश्री वाडीभस्मे , दिव्या धुरडे , पल्लवी शामकुळे , रिता मुळे , निलीमा बावणे , अश्विनी जिचकार आदी उपस्थित होते . सुत्रसंचालन डॉ . हंबीरराव मोहीते यांनी केले . वर्धा मार्गावरील मनपाच्या खापरी जकात नाक्याचे आधुनिकीकरण व विस्तारीकरण करण्यात येत आहे . अत्याधुनिक वाहनतळांतर्गत येथे एकाचवेळी २५० वाहनांचा थांबा असेल . ११ कोटींच्या या प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील ३ कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली आहे . शुक्रवारी भाजपचे अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या हस्ते या कामांचे भूमीपुजन होईल . महापौर प्रा . अनिल सोले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील .

खापरी नाक्यापाठोपाठ पुढील काळात पारडी , हिंगणा , वाडी नाक्यांचेही आधुनिकीकरण प्रस्तावित असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी पत्रकारपरिषदेत दिली .

खापरी नाका क्र . ८ येथे मनपाच्या मालकीची ० . ९३ हेक्टर क्षेत्र आहे . या प्रकल्पासाठी मिहानने ११ ​ महिन्यासाठी ४० पैसे प्रति वर्गमीटर दराने ३ . ५४ हेक्टर क्षेत्र दिले . त्यानुसार एकूण ४ . ७४ हेक्टर क्षेत्रावर हा प्रकल्प उभा करण्यात येत आहे . यात अनेक सोयीसुविधा देण्यात येत आहे . एकाचवेळी २५० जड वाहने या ठिकाणी उभे राहू शकतील . मिहानने दिलेली ११ महिन्याची लीज वाढवून ३० वर्षांकरीता करावी , असे निवेदनही मनपाने राज्य सरकारला दिले आहे . यानुसार लीज संपली , तरी या ठिकाणाचा ट्रान्सपोर्ट प्लाझा म्हणून वापर होऊ शकेल . लीजसाठी मनपाला वार्षिक २ लाख ८३ हजार २०० रूपये द्यावे लागेल .

राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या टोल नाक्यांच्या धर्तीवर येथे १२ काऊन्टर असतील . जेणेकरून येथे येणाऱ्यांना तत्काळ जकात भरून बाहेर पडणे सोपे होईल . वाहनचालकांसाठी विश्रामगृह व स्वच्छतागृहांची व्यवस्था राहणार आहेत . सोबतच प्रकल्पांतर्गत ओपन रेस्टॉरेंटही उघडले जाणार आहे .

शहरात जड वाहनांच्या प्रवेशाची वेळ ठरली असल्याने जकात विभागाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर अनेक वाहने रस्त्यांवर उभी राहतात . अशावेळी रस्त्यांवरील वाहतुकीचा खोळंबा टाळण्यासाठी या नाक्यावर एक वाहनतळ उपलब्ध होईल . त्यामुळे सकाळी ७ ते दुपारी १२ व सायंकाळी ४ ते रात्री ९ पर्यंत मोठया प्रमाणात येथे वाहनांची गर्दी राहील . या प्रकल्पाचे कंत्राट प्रसिद्ध कंत्राटदार एल . सी . गुरूबक्षानी यांना मिळाले आहे . ११ कोटींपैकी ३ कोटींच्या कामाचे कार्यादेशही निघाले आहेत . यात इमारत , डब्ल्यूबीएम व वाहनपार्क पहिल्या टप्प्यात तयार करण्यात येईल . दुसऱ्या टप्प्यात उर्वरीत काम पूर्ण होईल .

अशा असतील सुविधा
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   21°3'20"N   79°3'14"E
This article was last modified 12 वर्षांपूर्वी