मिहानमधील अग्निशमन केंद्र

India / Maharashtra / Nagpur /
 अग्निशमन दल  गट निवडा

सध्या पंगू अवस्थेत असलेले मिहानमधील अग्निशमन केंद्र मनपाने ताब्यात घ्यावे, अशी हाक एमएडीसीने दिली आहे. यासंबंधी लवकरच निर्णय होण्याचे संकेत आहेत. असे झाल्यास मनपाला मिहानमध्येही अग्निशमन कर लावावा लागेल. शिवाय, त्यासाठी वेगळी आर्थिक तरतूदही करावी लागेल. यासाठी आधी मनपा महासभेत प्रस्ताव पारित करणे आवश्यक आहे. महापौर प्रवीण दटके यांनीही या वृत्तास दुजोरा दिला असून, याबाबत गंभीरतेने विचार सुरू असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मनपातर्फे प्रस्तावित सोनेगाव केंद्राचा प्रस्ताव मागे घ्यावा लागण्याची शक्यता आहे.

मिहानमधील अग्निशमन केंद्र मनपाने चालवावे यासाठी लवकरच एमएडीसी व मनपा यांच्यातील अधिकाऱ्यांमध्ये बैठक होणार असल्याचे, अग्निशमन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे. यासंबंधी एमएडीसीने मनपाला एक पत्र पाठविले आहे. सध्या मिहानमध्ये असलेले अग्निशमन केंद्र बाल्यावस्थेत आहे. तेथे एक चालक व दोन फायरमन हे केंद्र चालवित आहे. यासोबतच मिहानतर्फे मनपाचे माजी मुख्य अग्निशमन अधिकारी सुनील मेश्राम यांचीही सेवा घेतली जात आहे. असे केंद्र चाल​विण्यापूर्वी मनपाला महसूल बाबीवर विचार करावा लागेल. मिहानमध्ये असलेल्या कंपन्यांकडून अग्निशमन कर आकारला जात नाही. मनपा हद्दीत अशी सेवा द्यावयाची झाल्यास मनपाला नागरिकांप्रमाणे त्यांच्याकडूनही हा कर आकारावा लागेल. मनपाने आधीच शहरात अग्निशमन केंद्रांची सेवा विस्तारित करून संख्या वाढविण्याचे प्रस्तावित केले आहे. सध्या शहरात आठ केंद्र असून, ते पाच केंद्राला पुरतील एवढ्याच मनुष्यबळाची सेवा मिळत आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   21°3'19"N   79°1'4"E
This article was last modified 10 वर्षांपूर्वी