एमआरओ अर्थात विमान देखभाल व दुरुस्ती केंद्र (नागपूर)

India / Maharashtra / Nagpur / नागपूर
 aviation (en), उत्पादन, aircraft hangar (en)
 Upload a photo

एअर इंडिया लिमिटेड ही कंपनी मिहान-सेझमध्ये ५० एकर जागेवर एमआरओ उभारत आहे. संपूर्ण प्रकल्प व जमीन एअर इंडियाची आहे. मात्र, तांत्रिक उभारणी बोइंग करीत आहे. मध्यम आकाराच्या (बोइंग ७३७) तीन विमानांची एकावेळी दुरुस्ती करण्याची रचना या एमआरओमध्ये असेल. सुमारे ५५० कोटी रुपये गुंतवणुकीची योजना एअर इंडिया आणि बोइंगने आखली आहे. त्यापैकी २६५ कोटी रुपये आतापर्यंत गुंतविण्यात आले आहेत, असे कंपनीकडून बीओएला कळविण्यात आले आहे.आता तिसरी मुदतवा एअर इंडिया‌ने या एमआरओसाठी १ सप्टेंबर २०१० ला परवानगी घेतली होती. त्यानंतर त्यांना दोन मुदतवाढी मिळाल्या. आता ३१ ऑगस्टला त्यांची अखेरची मुदतवाढ संपत आहे. यानंतर तिसरी वाढ मिळण्यासाठी त्यांनी अर्ज केला आहे. - अडीच किमी लांब , ४० मीटर रुंद व १५ फूट खोल टॅक्सी वेचे काम सूरू
देखभाल व दुरुस्तीसाठी नागपुरात यायला तयार असलेल्या बोईंगच्या विमानांना अखेर मार्ग मिळाला आहे. धावपट्टीवर विमाने उतरून ती बोईंगच्या एमआरओ केंद्रात आणण्यासाठी आवश्यक असलेल्या टॅक्सी वेच्या उभारणीला मिहानमध्ये जोमाने सुरुवात झाली आहे. पीबीए इन्फ्रास्ट्रक्चरकडे या कामाचे कंत्राट आहे.

एअर इंडियाच्या सहकार्याने बोईंग कंपनी एमआरओ अर्थात विमान देखभाल व दुरुस्ती केंद्र उभारत आहे. हे केंद्र सध्याच्या धावपट्टीपासून सुमारे अडीच किमी दूर आहे. नवीन धावपट्टी उभारण्याचा अद्याप निर्णय झालेला नाही. यामुळे सध्याची धावपट्टी आणि एमआरओ यांना टॅक्सी वे मार्फत जोडले जात आहे. बोईंगचा प्रकल्प पूर्ण रुपात सुरू होण्याच्यादृष्टीने ही महत्त्वाची घडामोड आहे.

२.५ किमीचा हा टॅक्सी वे ४० मीटर रुंद असेल. तर , ६० टनाच्या विमानांचा भार सोसण्यासाठी टॅक्सी वे १५ फूट जाडीचा असेल. सुमारे तीन ते चार पदरी क्राँक्रीटचा हा मार्ग उभारला जात आहे. मुख्य मार्ग ४० मीटर रुंद असला तरी , त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी २३.५ मीटर जागा सोडली जाणार आहे. अशाप्रकारे आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा टॅक्सी वे उभारण्याची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. पुढील दहा महिन्यात हा मार्ग पूर्ण केला जाणार आहे. तशी अटच कंत्राट करारात आहे. यानुसार मार्च-एप्रिल २०१२ पर्यंत पहिले विमान बोईंगच्या एमआरओमध्ये दुरुस्तीसाठी येऊ शकेल.

शिवणगावसाठी विशेष गेट

बोईंगसाठीचा टॅक्सी वे हा शिवणगवाला जाणाऱ्या रस्त्यात आहे. यामुळे शिवणगावसाठी आता विशेष गेट उभारले जाणार आहे. सध्या काम सुरू असताना तसेच भविष्यात ‌विमानांची ये-जा सुरू असताना हे गेट बंद ठेवले जाईल.

चार कंपन्यांनी भरल्या निविदा

टॅक्सी वे साठी चार कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. त्यामध्ये कंत्राटदार पीबीएसह एल अॅण्ड टी , रोमन टारमॅक व आग्रा येथील आर अॅण्ड सी कंपनीचा समावेश होता. मात्र बांधकाम क्षेत्रातील अव्वल एल अॅण्ड टी आणि विमानतळावरील अॅप्रनची उभारणी केलेल्या रोमन टारमॅकला मागे टाकून पीबीएने सुमारे ७३ कोटी रुपयांचे हे कंत्राट जिंकले.एअर इंडिया लिमिटेडचा हा एमआरओ ५० एकर जागेवर उभा होत आहे. संपूर्ण प्रकल्प व जमीन एअर इंडियाची आहे. मात्र, तांत्रिक उभारणी बोइंग करीत आहे. मध्यम आकाराच्या (बोइंग ७३७) तीन विमानांची एकावेळी दुरुस्ती करण्याची रचना या एमआरओमध्ये असेल. सुमारे ५५० कोटी रुपये गुंतवणुकीची योजना एअर इंडिया आणि बोइंगने आखली आहे. त्यापैकी २६५ कोटी रुपये आतापर्यंत गुंतविण्यात आले आहेत. याआधारे पहिल्या टप्प्यात विमानांची दुरुस्ती होणार आहे. हा टप्पा डिसेंबरमध्ये सुरू होईल, या आश्वासनावर कंपनीला सेझच्या मंजुरी मंडळाने मुदतवाढ दिली आहे. प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात विमानासह इंजिन दुरुस्तीही होणार आहे. इंजिन दुरुस्ती सुविधेची उभारणी आता सुरू झाली आहे, असे कंपनीकडून मंजुरी मंडळाला कळविण्यात आले आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   21°4'34"N   79°2'3"E
  •  23 किमी.
  •  119 किमी.
  •  254 किमी.
  •  262 किमी.
  •  285 किमी.
  •  374 किमी.
  •  522 किमी.
  •  539 किमी.
  •  702 किमी.
  •  879 किमी.
This article was last modified 12 वर्षांपूर्वी