लोकशाहीर अण्णा भाऊ साठें (नागपूर)

India / Maharashtra / Nagpur / नागपूर / दक्षिण अंबाझरी मार्ग

नागपुरात अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन
दिवंगत कम्युनिस्ट विचारवंत गोविंद पानसरे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा व विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांच्या नावाने साहित्य संमेलन आयोजित करणे सुरू केले होते. राज्याच्या विविध विभागांमध्ये हे संमेलन घेण्यात येते. अण्‍णा भाऊंच्या विचारांचा परिपोष व्हावा, नव्या पिढीपर्यंत त्यांचे कार्य व विचार पोहोचावेत, या दृष्टीने ही संमेलने घेण्यात येतात. यापैकी चौथे संमेलन नागपुरात २०१२मध्ये घेण्यात आले होते. प्रगतीशील लेखक संघाने आयोजित केलेल्या या संमेलनाचे अध्यक्ष एकनाथ आव्हाड होते. आमदार निवासाच्या प्रांगणात हे संमेलन घेण्यात आले. नेताजी राजगडकर यांच्या पुढाकाराने हे संमेलन झाले होते,नुकतेच स्वातंत्र्य मिळाले असतानाच्या काळात काटोल येथे लाल बावटा कलापथकाच्यावतीने लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अण्णा भाऊंसह शाहीर अमर शेख, दत्ता गव्हाणकर व इतर कलाकारही या कार्यक्रमासाठी आले होते. शाळेच्या मैदानात झालेल्या या कार्यक्रमाला प्रचंड गर्दी होती आणि तकलादू मंडपात कार्यक्रम सुरू होता. अचानक पाऊस सुरू झाला आणि सगळ्यांची त्रेधा उडाली. पावसाचा जोर वाढल्याने त्यावेळच्या काटोलमधील प्रकाश टॉकीजमध्ये कार्यक्रम घेण्याचे ठरले. तेथे राजकपूरचा प्रचंड लोकप्रिय असा 'बरसात' चित्रपट त्यावेळी सुरू होता. लोकांच्या आग्रहाखातर तो चित्रपट बंद करून अण्‍णा भाऊंचा कार्यक्रम तिथे सुरू करावा लागला होता.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   21°7'36"N   79°4'7"E
  •  20 किमी.
  •  124 किमी.
  •  258 किमी.
  •  259 किमी.
  •  291 किमी.
  •  374 किमी.
  •  525 किमी.
  •  544 किमी.
  •  699 किमी.
  •  885 किमी.
This article was last modified 9 वर्षांपूर्वी