Wikimapia is a multilingual open-content collaborative map, where anyone can create place tags and share their knowledge.

New English High School Mahal (Nagpur)

India / Maharashtra / Nagpur

न्यू इंग्लिश प्राथमिक शाळा, महाल येथे
आयोजित संस्कार शिबिराचा समारोप पार
पडला. ४ ते १० वर्षे वयोगटातील
विद्याथ्र्यांसाठी या शिबिराचे उद्घाटन कनिष्ठ
महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रांजली जोशी
यांच्या उपस्थितीत झाले. ८० विद्याथ्र्यांनी
शिबिरात सहभाग नोंदवला.
मुख्याध्यापिका सुनीता टिळक यांच्या
मार्गदर्शनात ब्लॅकबेल्ट सचिन अंजीकर यांनी
मुलांना कराटेचे धडे दिले. संगीत, नाट्य
अभिनय, हस्तकला, हस्ताक्षर यांचे मार्गदर्शन
देशपांडे, अल्का खांडेकर, श्रद्धा पाठक,
प्रांजली जोशी यांनी केले. प्राचार्या जयश्री
भारद्वाज यांनी कथाकथन, अभिनयातून संस्कार
व पपेट शोच्या माध्यमातून विद्याथ्र्यांना
स्वच्छता व आरोग्याची माहिती दिली.
बाबासाहेब नंदनपवार यांच्या मार्गदर्शनाने
शिबिराचा समारोप झाला. संस्थेचे सदस्य
श्रीपाद रिसालदार अध्यक्षस्थानी होते.
विद्याथ्र्यांनी तयार केलेल्या विविध आकर्षक
वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले. कार्यक्रमाला
३०० पालक उपस्थित होते. शिबिराच्या
यशस्वितेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका
श्रीमती अमरावतीकर व उपमुख्याध्यापिका
श्रीमती पुराणिक यांचे सहकार्य लाभले.
न्यू इंग्लिश शाळेत संस्कार शिबिराचा समारोप
Nearby cities:
Coordinates:   21°8'48"N   79°6'16"E
This article was last modified 7 years ago