R-POWER ADDITIONAL LAND-Rajiv Thakrele

India / Maharashtra / Sindi / Reliance power Rd, Plot D3
 production  Add category
 Upload a photo

रिलायन्स पॉवरच्या बुटीबोरी वीज केंद्रात उत्पादन सुरू
रिलायन्स पॉवरने नागपूर नजीक बुटीबोरी येथे स्थापित केलेल्या ६०० मेगावॅट औष्णिक वीज केंद्रातील पहिल्या युनिटमध्ये उत्पादन सुरू झाले आहे. या युनिटमधून ३०० मेवॅ. वीजनिर्मिती होईल यामुळे रिलायन्स पॉवर एकूण निर्मिती क्षमता १५४०
मेवॅ. झाली आहे. या केंद्रातील वीज ही राज्यातील उद्योगांना देण्यात येणार आहे. याप्रकल्पातील बॉयलरपासून तेसिक्रोनायझेशनपर्यंतचे संपूर्ण काम २१ महिन्यांत पूर्ण करण्यात आले. या
प्रकल्पातील दुसरया युनिटमधील निर्मिती देखील वर्षाअखेर सुरू होणार आहे. या प्रकल्पात एकूण ३६०० कोटींची गुंतवणूक करण्यात आली असून वीज क्षेत्रात महाराष्ट्रात झालेली ही सर्वाधिक गुंतवणूक मानली जाते. या प्रकल्पाची क्षमता ६०० मेवॅ
असूनही एकूण २७५ एकर जागेत साकारण्यात आला आहे. यासंदर्भात बोलताना मुख्य कार्याधिकारी जे. पी.
चलसानी यांनी, या प्रकल्पामुळे आता रिलायन्स पॉवर खाजगी क्षेत्रातील मोठी कंपनी म्हणून उदयास येत असल्याचे
सांगितले. या प्रकल्पात पर्यावरणानुकूल वीज उत्पादन होत असून यातील राखेचा वापर रिलायन्स समूहाच्या सिमेंट प्लांटमध्ये करण्यात येणार आहे. रिलायन्स पॉवरच्या बुटीबोरी वीज केंद्रात उत्पादन सुरू
Nearby cities:
Coordinates:   20°56'48"N   78°56'0"E
This article was last modified 13 years ago