Bhandewadi Landfill site (Nagpur)

India / Maharashtra / Nagpur
 Upload a photo

भांडेवाडी डंपिग यार्ड,
पूर्व नागपुरातील भांडेवाडी डंपिग यार्डमध्ये कचरयाचे डंपिग केले जाते. कचरयाचे डंपिगमुळे या भागातील अनेक वस्त्यांमध्ये दुर्गंधी येते. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्यामुळे, यावर उपाययोजना करण्यासाठी महापौर अनिल सोले यांनी आज नीरीच्या संचालकांना एक पत्र पाठवून मार्गदर्शन व सहकार्य मागितले आहे. दुर्गंधीपासून नागरिकांना मुक्त करण्यासाठी नीरीने उपाययोजना सुचवावी. त्यासाठी महापालिका नीरीला संपूर्ण सहकार्य करण्यास तयार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या
भागातील नागरिक दुर्गंधीचा सामना करीत आहेत. शहरातील सर्व कचरा भांडेवाडी डंपिग यार्डमध्ये टाकला जातो. वर्धमाननगर, देशपांडे लेआऊट, पारडी, छापरूनगर, हिवरीनगर, भांडेवाडी, या भागातील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. एवढेच नव्हे तर अनेकदा सुमारे ३ किलोमीटरपर्यंत ही दुर्गंधी पसरते. या मागणीसाठी अनेकदा तक्रारी करण्यात आल्या आणि आंदोलनही करण्यात आले आहे. हा प्रश्न सुटावा यासाठी आता महापौरांनी स्वत:हून पुढाकार घेतला आहे. सांडपाणी प्रक्रिया केंद्रही भांडेवाडी येथेच आहे. जैविक कचराही येथेच आणून टाकला जातो. पूर्व नागपूरचे आमदार व शहर भाजपाध्यक्ष कृष्णा खोपडे यांनी यापूर्वी आंदोलन केले आहे. मेट्रो रिजन झाल्यामुळे डंपिग यार्डसाठी शहराबाहेर जागा आरक्षित करावी असेही आमदार खोपडे यांचे म्हणणे
आहे. वारयासोबत दुर्गंधी पसरत असल्यामुळे या भागातील लोकांना नाक दाबून राहावे लागते. शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. नव्या वस्त्यांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे कचराही मोठ्याच प्रमाणात उचलला जातो. आधी ७५० टन
कचरा उचलला जात होता. गेल्या वर्षभरात सुमारे १५० टनानी यात वाढ झाली आहे. महापौर व आयुक्त भांडेवाडीला लवकरच भेट देणार आहेत. नीरीच्या उपाययोजनेच्या अहवालानंतर त्यावर महापालिका निर्णय घेईल. भांडेवाडी डंपिग यार्डमधील दुर्गंधी उपाययोजनेसाठी महापौरांचे नीरीला पत्र.
Nearby cities:
Coordinates:   21°8'27"N   79°9'12"E
This article was last modified 13 years ago