पंचमढी म्हणजे मध्यप्रदेशातलं एक छोटंसं थंड हवेचं ठिकाण
India /
Madhya Pradesh /
Pachmarhi /
Pachmarhi
World
/ India
/ Madhya Pradesh
/ Pachmarhi
जग / भारत / मध्यप्रदेश / हुशंगाबाद
नगर क्षेत्र, hill station (en)
पंचमढी म्हणजे मध्यप्रदेशातलं एक छोटंसं थंड हवेचं ठिकाण . समुद्रसपाटीपासून सुमारे ११०० मीटर उंच असलेलं हे ठिकाण नितांत सुंदर आहे . यालाच सातपुड्याची राणी असंही म्हणतात . इथली निसर्गातली विविधता मनाला अक्षरश : मोहून टाकते .आजपर्यंत ट्रेकिंगच्या निमित्तानं बऱ्याच ठिकाणांना भेटी दिल्या ; पण या सगळ्या ठिकाणांमध्ये मला आवडलेलं ठिकाण म्हणजे पंचमढी ! मध्यप्रदेशमधील एक छोटंसं थंड हवेचं ठिकाण . यालाच सातपुड्याची राणी असंही म्हणतात . समुद्रसपाटीपासून सुमारे ११०० मीटर उंच असलेलं हे ठिकाण एक नितांत सुंदर असं स्थळ आहे .
ब्रिटिश सैन्यातील एक अधिकारी जेम्स फोर्स्थ १८५७ मध्ये इथं आला अन् या राणीच्या प्रेमात गुरफटून गेला ! घनदाट जंगल आणि जैवविविधतेनं परिपूर्ण असलेलं हे ठिकाण भटक्यांचं नंदनवन आहे . गूढ आणि घनदाट जंगलातून लांबच लांब पसरलेले रस्ते आपल्याला इथल्या अनेक रमणीय स्थळांकडे घेऊन जातात . ' पंचमढी ' ला सुमारे ४८ प्रेक्षणीय स्थळं आहेत . ज्यामधील काही स्थळं सामान्य लोकही अगदी सहज जाऊन पाहू शकतील अशी आहेत , तर काही अवघड ठिकाणं ट्रेकर्सनी जाऊन पहाव्यात अशा आहेत .
इथं आढळणारी जैवविविधता पाहता युनेस्कोनंही २००९च्या मे महिन्यात पंचमढीला जैव विभागाचा दर्जा दिलाय . खरं तर , संपूर्ण पंचमढी प्रेक्षणीय आहे ; पण तरीही वेळ आणि चालण्याची ताकद यांची मर्यादा असल्यास ही काही ठिकाण आवर्जून पहावीत .
पांडव गुंफा : पंचमढीपासून सुमारे एक कि . मी . अंतरावर या गुहा आहेत . त्यांच्या रचनेवरून त्या बौद्धकालीन असाव्यात , असं मानलं जातं . इथे एकूण पाच गुहा असल्यानं या गावाला पंचमढी ( पंच ( पाच ) मढी ( घर )) हे नाव पडलं असं सांगितलं जातं . या ठिकाणाची आख्यायिका अशी आहे , की पांडव त्यांच्या वनवासामध्ये इथे काही काळ राहिले होते म्हणून याला पांडवगुंफा असं हटलं जातं .
धूपगढ : हे सातपुडा पर्वतराजीतील सर्वोच्च शिखर आहे . उगवत्या सूर्याच्या पहिल्या किरणापासून ते मावळणार्या सूर्याचा शेवटच्या किरणापर्यंत सतत उन्हाचा मारा आपल्या माथ्यावर झेलत धूपगढ उभा आहे . धूपगडावर एकाच जागी बसून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहता येऊ शकतो . सतत उन्हामध्ये असल्यामुळेच याला धूपगढ हे नाव देण्यात आलंय .
चौरागड : पंचमढीचारा देव म्हणजे शंकर ! त्यामुळे इथं जटाशंकर , गुप्त महादेव अशी देवस्थानं आहेत . त्यातही सगळ्यांत जास्त महत्व आहे ते चौरागडला . इथे शंकराचं मोठ्ठं मंदिर असून , सुमारे बाराशे पायऱ्या चढून आलं , की आपण चौरागडाच्या माथ्यावर येतो आणि दिसतात लहान मोठे त्रिशूळ . कारण इथं येऊन नवस बोलायचा आणि तो पूर्ण झाला , की शंकराला त्रिशूळ अर्पण करायचा , अशी प्रथा इथं रूढ आहे . प्रत्येक वर्षी शिवरात्रीला इथं मोठा उत्सव साजरा केला जातो .
रॉक पेंटिंग : काळ्याकभिन्न कातळावर चितारलेली ही चित्रं पाहायला इथं जायलाच हवं . दहा हजार वर्षांपूर्वी काढलेली ही चित्रं आजही आपल्या मनाला भुरळ घालतात . विनंती अशी की कृपया तिथं जाऊन आपली चित्रकला दावण्याचा मूर्खपणा करू नये . आपलं आपल्या प्रेयसीवर कितीही प्रेम असलं , तरी ते व्यक्त करण्याची ही जागा नाही याचं भान राखलं पाहिजे .
या जागांव्यतिरिक्त इथले धबधबेही आपल्याला आनंद देणारे आहेत . बी फॉल , अप्सरा , विहार , राजताप्रपात ( पंचमढी मधील सर्वांत उंच ) हा ३५० फूट उंचीचा धबधबा आहे .
पंचमढीला कसं जाल ?
* हवाई मार्गानं जायचं असल्यास भोपाळ हे जवळचं ठिकाण ( १९५ कि . मी .)
* रेल्वेनं पुणे - हावडा मार्गावरील पिपरिया इथे उतरून पुढं बसनं जाणं शक्य आहे . पिपरिया ते पंचमढी अंतर ४५ कि . मी . आहे . तसंच नागपूरहून रस्त्यानंही पंचमढीला जाता येतं . ते अंतर सुमारे २६७ कि . मी . आहे .

Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 22°27'29"N 78°25'11"E