Wikimapia is a multilingual open-content collaborative map, where anyone can create place tags and share their knowledge.

डलहौजी

India / Himachal Pradesh / Dalhousie / SH- 33
 शहर, पर्यटन, hill station (en), mandal headquarter (en)

तालुक्यातील डलहौजी, जिल्हा चम्बा​​​​​​​​​​​, हिमाचल प्रदेश​, भारत

डलहौसी
हिमाचलमधील एक शांत, निसर्गसंपन्न छोटेखानी गाव म्हणजे डलहौसी. रावी नदीच्या काठी २००० मीटर उंचीवर पाच टेकडय़ांवर चंबा खोऱ्यात हे थंड हवेचे ठिकाण वसलेले आहे. ब्रिटिश गव्हर्नर डलहौसी याने हे ठिकाण शोधून काढले. म्हणून ते आजही त्याच्या नावाने प्रसिद्ध आहे. ब्रिटिश स्थापत्यकलेचे नमुने आजही आपणास येथे बघायला मिळतात. तुरळक काही सुरेख चच्रेस, बंगले आपल्याला जुन्या स्वातंत्रपूर्व काळात घेऊन जातात. पाइन, देवदारचे वृक्ष डलहौसीच्या सौंदर्यात भर घालतात. रात्री आजूबाजूला टेकडय़ांच्या उतारावरून लुकलुकणारे दिवे बघितले की एवढी घरे सकाळी कुठे धुक्यात लुप्त होतात कळत नाही. आपल्या पाचगणीसारखी इथे अनेक प्रशस्त पब्लिक स्कूल आहेत.
डलहौसीमध्ये अतिशय दाट, उंच देवदारची झाडे थेट तुमच्या हॉटेलच्या बाल्कनीतून आत डोकावत असतात. झाडावरच्या खारूताई सतत अखंड कामाच्या गडबडीत असल्यासारखे इकडून तिकडे फिरत असताना बघण्यात मोठी गंमत असते. इथली माकडे तुमचे लक्ष नसेल तर खोलीत घुसून नुसता धुमाकूळ घालतात.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   32°32'25"N   75°58'38"E
  •  46 किमी.
  •  48 किमी.
  •  77 किमी.
  •  116 किमी.
  •  180 किमी.
  •  182 किमी.
  •  224 किमी.
  •  233 किमी.
  •  236 किमी.
  •  244 किमी.
Array