माथेरान

India / Maharashtra / Matheran /
 टेकडी, नगर क्षेत्र, hilltop (en), hill station (en)
 Upload a photo

थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान नावारूपास आले आहे. त्यामुळे उन्हाळ्यात इथे पर्यटकांची नेहमीच गर्दी होत असते. मात्र अलीकडच्या काळात दिवाळी आणि सलग सुट्टय़ांमध्येही पर्यटक माथेरानमध्ये दाखल होऊ लागले आहेत. दिवाळीच्या सुट्टीसाठी माथेरानमध्ये आरक्षण झाले आहे. महाबळेश्वरही सुटीत गजबजणार आहे. एकूणच दिवाळीत पर्यटनाला जाण्याकडे कल वाढत आहे.
हिरवागार निसर्ग, लाल मातीच्या वाटा, घोडय़ांच्या टापांचा आवाज, पक्षी आणि कीटकांचा किलकिलाट, सर्वत्र बागडणारी माकडे, कडेकपारीतून वाट काढत धावणारी मिनी ट्रेन आणि धुक्यामधून डोकावणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून क्षणभर विरंगुळ्यासाठी माथेरान हे कायमच पसंतीला उतरले आहे.
ब्रिटिश कलेक्टर सर एच. सी. मॅलेट यांनी २१ मे १८५० ला माथेरानचा शोध लावला. येथील अर्थकारण पर्यटनावर अवलंबून आहे. दरवर्षी करोडो रुपयांची उलाढाल या पर्यटन व्यवसायातून होत आहे. वाहनांना १०० टक्के बंदी असणारे हे राज्यातील एकमेव ठिकाण आहे.
काळानुरूप माथेरानच्या जडणघडणीत पर्यटनाच्या दृष्टिकोनातून बदल होत गेले आहेत. १९०७ साली माथेरानला सर आदमजी पिरभाय यांनी मिनी ट्रेनने जोडले होते. त्या काळी २२ लाख रुपये खर्चून ही रेल्वे सुरू करण्यात आली होती. गेल्या मे महिन्यापासून ही रेल्वे सेवा खंडित असल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे. तरी व्हॅली क्रॉसिंग, जंगल ट्रेकिंग, घोडसवारी यांसारखे साहसी प्रकार आणि आकाशदर्शन प्रकल्प प्रमुख आकर्षण आहे.
थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे माथेरान पूर्वी उन्हाळ्यात गजबजलेले असायचे. मात्र आता वर्षभर पर्यटक असतात. या दिवाळीत माथेरानमध्ये मोठय़ा संख्येने पर्यटक दाखल होणार आहेत. माथेरानमध्ये लहान-मोठे ३५० हॉटेल्स व्यवसायिक आहेत. यातील जवळपास आरक्षण पूर्ण झाले आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°58'58"N   73°16'11"E
  •  38 किमी.
  •  65 किमी.
  •  128 किमी.
  •  260 किमी.
  •  492 किमी.
  •  547 किमी.
  •  777 किमी.
  •  815 किमी.
  •  887 किमी.
  •  954 किमी.
This article was last modified 8 वर्षांपूर्वी