कोका वन्यजीव अभयारण्य

India / Maharashtra / Bhandara /
 अरण्य  गट निवडा
 Upload a photo

आपल्या नैसर्गिक सौंदर्याने मनाला भुरळ पाडणारा जिल्हा म्हणून भंडारा जिल्ह्यकडे पाहिले जाते. या जिल्ह्यत कोका वन्यजीव अभयारण्य आहे. जैवविविधतेने संपन्न असलेल्या या ९७.६२४ चौरस किमीच्या वनक्षेत्राला १८ जुलै २०१३ रोजी अभयारण्याचा दर्जा मिळाला. आज ते नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचा एक भाग आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव वन्यजीव अभयारण्य, नागझिरा वन्यजीव अभयारण्य, न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्य आणि कोका वन्यजीव अभयारण्य मिळून नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे.
भंडारा जिल्ह्यच्या भौगोलिक क्षेत्रापकी एक तृतीयांश क्षेत्र जंगलाने व्यापले आहे. नवे नागझिरा, उमरेड करहांड, कोका अशा तीन अभयारण्यांनी या जिल्ह्याच्या सौंदर्यात विलक्षण भर टाकली आहे. कोका अभयारण्य हे ब्रिटिशांच्या काळात ओल्ड रिझव्‍‌र्ह फॉरेस्ट म्हणून ओळखले जायचे. त्याच वनक्षेत्राला पुढे राखीव वनक्षेत्राचा दर्जा मिळाला. अनेक प्रकारच्या वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास असलेल्या या जंगलात वाघ, बिबटय़ा, गवे, अस्वल, काळवीट, नीलगाय, सांबर, रानकुत्रे, चितळ, रानडुक्कर यासारखे प्राणी आपण पाहू शकतो. विविध पक्ष्यांचा किलबिलाट आपले लक्ष वेधून घेतो. अभयारण्यात नैसर्गिक पाणवठे मोठय़ा प्रमाणात आहेत. परंतु जिथे पाण्याची कमतरता जाणवते तिथे सौरपंपावर चालणाऱ्या विंधन विहिरींद्वारे सिमेंटच्या टाक्यांमध्ये पाणी सोडण्यात आले असून त्याद्वारे वन्यजीवांची तहान भागवली.
जंगल सफारीत वाघोबाचे आणि इतर वन्यजीवांचे दर्शन मनाला प्रसन्न करणारे आणि वन पर्यटनाचा मनस्वी आनंद देणारे आहे. इथले आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे वन विभागाने गावातील स्थानिक मुलांनाच गाईडचे प्रशिक्षण दिल्याने त्यांनाही जंगल सफारीच्या माध्यमातून रोजगार आणि उत्पन्नाचे साधन मिळाले आहे. हमखास होणारे वन्यजीवांचे दर्शन हे इथलं वैशिष्टय़ असल्याने पर्यटकांचा ओढा कोका वन्यजीव अभयारण्याकडे वाढला आहे.
विविध प्रजातीच्या वृक्षराईने वेढलेल्या या अभयारण्यात अनेक वनौषधीचा खजिना दडलेला आहे. वनौषधीचे भंडार म्हणूनही कोका अभयारण्याची वेगळी ओळख आहे. तृणभक्षी प्राण्यांची रेलचेल, मोर, रानकोंबडे आणि रंगीबेरंगी पक्षी पर्यटकांना आकर्षति करतात. कोका वन विश्रामगृह, बगिचे, बांबूच्या कुटय़ा, मचाने, पाणवठे, चांगले रस्ते, राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय यामुळे पर्यटकांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून त्यामुळे स्थानिकांच्या हातालाही रोजगार मिळत आहे.
नागपूर-भंडारा हे अंतर ६५ किलोमीटर असून भंडाऱ्याहून चंद्रपूर प्रवेशद्वार १९ कि.मी. अंतरावर आहे. चंद्रपूर प्रवेशद्वारापासून जंगल सफारीसाठी जिप्सींची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पर्यटकांना स्वत:चे वाहनही जंगल सफारीसाठी वापरता येते. जंगल सफारीसाठी सकाळी आणि दुपारी अशा पद्धतीने दिवसातून दोन वेळा जाता
येते. अभयारण्याला भेट देण्यासाठी ऑनलाइन बुकिंगची व्यवस्था आहे. स्पॉट बुकिंग चंद्रपूर या प्रवेशद्वारावरही मिळू शकते. इको डेव्हलपमेंट कमिटीच्या तंबूमधून पर्यटकांना राहण्याची व जेवण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कसे जाल?
भंडारा बसस्थानक व भंडारा रोड रेल्वे स्टेशन हे या अभयारण्यासाठी जवळचे ठिकाण असून, स्वत:च्या वाहनानेही अभयारण्यापर्यंत पोहोचता येते. भंडारा शहरापासून पूर्वेला राष्ट्रीय महामार्गाने पलाडी तसेच शिंगोरी फाटय़ावरून आमगाव, टेकेपार माग्रे येथे पोहोचता येते. खासगी वाहनांची सुविधा भंडारा शहरातून उपलब्ध आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   21°9'23"N   79°46'41"E
  •  88 किमी.
  •  136 किमी.
  •  184 किमी.
  •  264 किमी.
  •  303 किमी.
  •  319 किमी.
  •  492 किमी.
  •  534 किमी.
  •  626 किमी.
  •  882 किमी.
Array
This article was last modified 7 वर्षांपूर्वी