नागझिरा अभयारण्य

India / Maharashtra / Tirira /
 अरण्य, nature conservation park / area (en), राष्ट्रीय उद्यान, animal sanctuary (en)

भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यच्या मधोमध असलेले नागझिरा अभयारण्य वन पर्यटकांना साद घालते. नवेगाव- नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यंमध्ये वसलेला आहे. हा प्रकल्प कान्हा, पेंच आणि ताडोबा व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा दुवा आहे. जैवविविधता संवर्धनासाठी अतिशय पोषक असे वातावरण असल्याने हा प्रकल्प खूप महत्त्वाचा आहे. वाघाबरोबरच अनेक वन्यप्राणी आणि पक्षी अधिवास येथे आहेत. या अभयारण्याच्या जवळच कोसमतोंडी, चोरखमारा, अंधारबन, नागदेव पहाडीसारखी प्रेक्षणीय स्थळे आहेत.
अभयारण्यात प्रवेश करताच रस्त्याच्या दुतर्फा अनेक हरणं शांतपणे गवत खाताना दिसतात. पावलागणिक दिसणारी हरणं आणि त्यांच्या आजुबाजूला हुंदडणारी माकडे हे दृश्य पाहण्यासारखे असते. नागझिरात ऊंचच ऊंच वाढणारी आणि घनदाट पांगोरा असलेली झाडं आहेत. अनेक वेलींच्या प्रजाती झाडाला लगटून मोठय़ाप्रमाणात फोफावल्याचे चित्र जागोजागी दिसते. जंगलाच्या मध्यावर एक विस्तीर्ण जलाशय आहे.
रात्रीच्यावेळी झाडांच्या फांद्यांमधून जमिनीवर अलगद झिरपणारा चंद्रप्रकाश आणि पाण्यातली चांदण्यांची श्िंापडण पाहणं, त्याचा आनंद घेणं अवर्णनीय असते. ताडोबानंतर नागझिरात वाघांचे दर्शन होऊ लागल्याने पर्यटकांचा ओढा इकडे वळाला आहे. उन्हाळ्याचे दिवस आणि संध्याकाळची वेळ म्हणजे वन्य प्राणी पाहण्यासाठी अतिशय उत्तम. पानगळीमुळे सागासारखे सगळे वृक्ष अंग झटकून पुन्हा फुलण्यासाठी मोकळे झालेले असतात. त्यामुळे दूरवरचा वेध घेणारी नजर आपल्याला अनेकदा खूप चांगले दृश्य टिपण्याचीही संधी देते. नागझिरा अभयारण्यात अंधारबन, बंदरचुवा, काटेथुवा अशा विचित्र नावाच्या बऱ्याच वैशिष्ट्यपूर्ण जागा आहेत.अभयारण्याशेजारीच पॅनोरमा पॉइंट आहे. शिवाय कपडय़ादेव मचाण आणि बंदरचूहा मचाण आहे, जिथून वन्यजीव प्राण्यांचे दर्शन आणि निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली उधळण पाहता येते. जंगल सफारीसाठी खासगी वाहनांबरोबरच वन विभागाच्या मिनी बसेस आणि इतर वाहने उपलब्ध आहेत. गोंदिया व साकोली येथे वन विभागाचे विश्रामगृह आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   21°15'55"N   79°57'25"E
  •  106 किमी.
  •  155 किमी.
  •  164 किमी.
  •  279 किमी.
  •  315 किमी.
  •  320 किमी.
  •  495 किमी.
  •  544 किमी.
  •  609 किमी.
  •  894 किमी.
Array
This article was last modified 8 वर्षांपूर्वी