त्रिमूर्तीनगरातील 'मीडियम इन्कम ग्रुप' अर्थात 'एमआयजी' कॉलनी (नागपूर)

India / Maharashtra / Nagpur / नागपूर
 Upload a photo

सर्व ‌उत्पन्न गटातील नागरिकांना स्वत:च्या हक्काची घरे मिळावी यासाठी गृहनिर्माण महामंडळाची जवळपास ३० ते ३५ वर्षांपूर्वी स्थापना झाली. यानंतर महामंडळाने विविध उत्पन्न गटासाठी कॉलनी उभ्या केल्या. आज मात्र काही ना काही कारणाने या कॉलनींकडे स्थानिक प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे तेथे समस्या निर्माण होतात. त्रिमूर्तीनगरातील 'मीडियम इन्कम ग्रुप' अर्थात 'एमआयजी' कॉलनीत अशाप्रकारे समस्याच खऱ्या अर्थाने मोठ्या झाल्याची स्थिती आहे.
पूर्वी केवळ बर्डी, महाल, इतवारीपुरते मर्यादित असलेले नागपूर शहर १९७० नंतर सध्याच्या दक्षिण-पश्चिम भागात वाढू लागले. यादरम्यान १९९० च्या दरम्यान रिंग रोड तयार झाला. या रस्त्यामुळे हा भाग जोडला गेला. यामुळे खामला, परसोडी, भामटी हे मौजे झपाट्याने विकसित होऊ लागले. त्रिमूर्तीनगर हा असाच रिंग रोडच्या निमित्ताने विकसित झालेला एक भाग होता. हा भाग विकसित होत असताना तेथे लघू, मध्यम व उच्च अशा तिन्ही उत्पन्न गटाची कॉलनी उभी झाली. पण महापालिकेने नुकत्याच केलेल्या एका कामामुळे येथील मध्यम उत्पन्न गटाच्या कॉलनीची स्थिती बिकट झाली आहे.एमआय‌जी कॉलनी ही त्रिमूर्तीनगरचा महत्त्वाचा भाग आहे. त्रिमूर्तीनगरकडून सुर्वेनगरकडे जाण्यासाठी या कॉलनीसमोरील रस्त्याचा उपयोग केला जातो. पण महापालिकेने पाइप लाइन जोडणीच्या नावाखाली येथील डांबरीकरण झालेला रस्ता खोदला. जवळपास चार फूट जाडा आणि दहा फूट मोठा खड्डा खणण्यात आला. आता पाइपलाइनचे काम पूर्ण होऊनदेखील १५ दिवस लोटले आहेत. पण रस्ता तसाच आहे. या कामाच्या कंत्राटदाराने पाइपलाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर थातूर-मातूर पद्धतीने केवळ खड्डा भरला. पण यामुळे रस्त्यावर निर्माण झालेले खाच-खळगे तसेच आहेत. याचदरम्यान अवकाळी पाऊसदेखील पडल्याने संपूर्ण रस्ता चिखल आणि पाण्याचे भरला होता. पण महापालिकेला त्याच्याशी काही घेणे-देणे नाही. आता पाऊस नसला तरी रस्त्यावरील खाच-खळगे धोकादायक आहेत. रात्रीच्या वेळी भीषण अपघाताचा भीती आहे. नेमका कॉलनी लागूनच हा रस्ता असल्याने येथील रहिवाशांचे हाल होताहेत.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   21°6'54"N   79°2'20"E
This article was last modified 10 वर्षांपूर्वी