पाटणजवळील चरंका असे या गावाचे नाव

India / Gujarat / Radhanpur /
 solar farm (en)  गट निवडा
 Upload a photo

गवताची काडीही उगवणार नाही, अशी गुजरातच्या कच्छच्या वाळवंटाची ओळख आहे. मात्र, याच कच्छच्या छोट्या रणामध्ये दररोज सौरउर्जेच्या माध्यमातून २१४ मेगावॉट वीजनिर्मिती होत आहे. या बाबतीत चीनच्या २०० मेगावॉटच्या प्रकल्पालाही मागे टाकण्यात यश आले आहे.
पाटणजवळील चरंका असे या गावाचे नाव असून, या गावाच्या दोन हजार ९६५ एकर परिसरात सोलार सेल आणि पॅनेल बसविण्यात आले आहे. सरकारी आणि खासगी अशा १७ कंपन्यांनी या परिसरामध्ये तब्बल नऊ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याचा दावा गुजरात सरकारकडून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकल्पांमुळे परिसरातील जमिनींचे भावही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. चार वर्षांपूर्वीपर्यंत एकरी २५ हजार रुपयांपर्यंत असणारे जमिनीचे भाव, आता प्रकल्पाच्या दीड किलोमीटरच्या परिघामध्ये एकरी सहा लाखांपर्यंत पोचले आहेत. केंद्र सरकारने जाहीर करण्यापूर्वीच सौरउर्जेविषयीच्या धोरणाची अंमलबजावणी केल्याचा दावा गुजरात सरकारने केला आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   23°54'11"N   71°12'20"E
  •  155 किमी.
  •  159 किमी.
  •  179 किमी.
  •  199 किमी.
  •  226 किमी.
  •  238 किमी.
  •  261 किमी.
  •  282 किमी.
  •  327 किमी.
  •  340 किमी.
This article was last modified 13 वर्षांपूर्वी