जामनगर | शहर, mandal headquarter (en), district headquarter (en)

India / Gujarat / Jamnagar /
 शहर, mandal headquarter (en), district headquarter (en)

तालुक्यातील जामनगर , जिल्हा जामनगर , गुजरात

सध्या गुजरातच्या पश्चिम समुद्र किनारपट्टीवर असलेले जामनगर शहर स्वातंत्र्यपूर्व ब्रिटिशराजमध्ये एक महत्त्वाचे आणि संपन्न संस्थान म्हणून ओळखले जात होते. जडेजा राजपुतांच्या वंशजांनी स्थापन केलेल्या या राज्याचे क्षेत्रफळ ९८०० चौ.कि.मी. होते आणि ब्रिटिश राजवटीने या संस्थानाला १३ तोफांच्या सलामींचा मान दिला. १९०१ साली या संस्थानाची लोकसंख्या ३,४०,००० होती.
जाम लाखाजीने गुजरातचा सुलतान बहादुरशाह याला पावागड घेण्यास मदत केल्यामुळे त्याला बारा गावे इनाम मिळाली. परंतु या गावांचा ताबा घेण्यास लाखाजी गेला असता त्याच्या दोन मावसभावांनी त्याला कैद करून हालहाल करून ठार मारले. त्यावेळी तिथून शिताफीने पळून गेलेला लाखाजीचा मुलगा जाम रावळ याने पुढे वडिलांच्या खुन्यांचा सूड उगवून त्यांनाही ठार मारले. जाम रावळ पुढे सौराष्ट्रात जाऊन त्याने आपले छोटे राज्य स्थापन केले. राज्याची राजधानी वसवून तिला नाव दिले नवानगर. नवानगरचे राज्यकत्रे आपल्या नावापूर्वी राजा या अर्थी 'जाम' हे विशेषण लावीत असत. त्यामुळे त्यांच्या राज्याचे व राजधानीचे नाव जामनगर झाले. समुद्रातून मोती काढणे आणि मच्छिमारी हा येथला परंपरागत व्यवसाय.
१५४० साली जामनगरचे राज्य स्थापन झाल्यापासून शेजारी राज्ये आणि मोगल सत्तेशी सततचा संघर्ष चालू राहिला. १८१२ साली तत्कालीन जामसाहिब जसजी याने ब्रिटिशांबरोबर संरक्षण करार करून त्यांची तनाती फौज राखली. संरक्षण करार झाल्यावर जामनगर शासकांनी राज्य प्रशासनात लक्ष घालून विविध क्षेत्रांमध्ये सुधारणा घडवून आणल्या.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   22°27'51"N   70°3'27"E
  •  70 किमी.
  •  91 किमी.
  •  254 किमी.
  •  259 किमी.
  •  263 किमी.
  •  285 किमी.
  •  291 किमी.
  •  317 किमी.
  •  525 किमी.
  •  538 किमी.
Array