शालिनी पॅलेस (कोल्हापूर)
India /
Maharashtra /
Kolhapur /
कोल्हापूर
World
/ India
/ Maharashtra
/ Kolhapur
जग / भारत / महाराष्ट्र / कोल्हापूर
उपहारग्रुह, महाल
रंकाळ्याच्या पश्चिमेला काठावर १९३१ ते ३४ या दरम्यान हा पॅलेस बांधण्यात आला. त्याला महाराणी कुमारी शालिनी यांचे नाव देण्यात आले. शहाजी छत्रपती महाराज व प्रमिलाराजे यांच्या शालिनी या कन्या. सध्याचे शाहू छत्रपती यांच्या आई. काळ्या कातीव दगडांपासून बांधलेल्या या राजवाड्याच्या भिंतींना इटालियन मार्बल लावले आहेत. त्याला भव्य कमानी आहेत. काचेच्या कमानी आणि मोठे कमानी घड्याळ खांबावर आहे. शीतल चंद्रप्रकाशात रंकाळा तलावात पॅलेसची प्रतिमा उमटते. यामुळे पॅलसचे सौंदर्य अधिकच खुलते.रंकाळा तलावाच्या विस्तीर्ण पार्श्वभूमीवर उभ्या असलेल्या भव्य अशा शालिनी पॅलेसच्या इमारतीला अवकळा आली आहे. गेली दोन-अडीच वर्षे ही इमारत कुलूपबंद असल्यामुळे परिसराला ओसाड हवेलीची कळा आली आहे. हिरव्यागार उद्यानाची जागा आता गवत आणि झुडपांनी व्यापली आहे.शालिनी पॅलेसवर सारस्वत आणि युको बँकेचे सुमारे ५० कोटीहून जास्त कर्ज आहे. कर्ज न फेडल्याने सारस्वत बँकेने त्याचा ताबा घेतला. त्याचा लिलाव करून कर्जवसुलीची प्रकिया बँकेने सुरु केली.माजी मंत्री श्रीपतराव बोंद्रे यांचे वर्चस्व असलेल्या महात्मा फुले सोसायटीकडून उद्योगपती शामराव चौगुले यांनी हा पॅलेस विकत घेतला होता. तेथे पॅलेस हॉटेल सुरू करण्यात आले होते. ही इमारत तारण ठेवून त्यांनी सारस्वत व युको बँकेकडून कर्ज घेतले होते, परंतु कर्ज फिटले नसल्यामुळे बँकेने ही इमारत ताब्यात घेऊन लिलाव प्रक्रिया सुरू केली होती. लिलाव होऊ नये, म्हणून सरकार पुढाकार घेईल, तसेच तिचा प्रशासकीय इमारत म्हणून वापर करण्याच्या दृष्टीने सरकार पावले उचलेल, अशी घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २६ जून २०११ रोजी केली. परंतु तीन वर्षात काहीच झाले नाही. आता बँकेने पॅलेसच्या लिलावाची प्रक्रिया पुन्हा सुरु केली आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 16°41'31"N 74°12'25"E
- न्यू पॅलेस 4 किमी.
- प्राचीन राजवाडा 38 किमी.
- राणीवसा 190 किमी.
- शिवाजी महाराजांचा राजवाडा 190 किमी.
- लाल महाल (लालमहालाला साडेतीनशे वर्षे पूर्ण) 207 किमी.
- आगाखान पॅलेस 210 किमी.
- Ganesh Mungase's House 225 किमी.
- साहुकारवाडा 416 किमी.
- पॅलेस मैदान 547 किमी.
- पांडे महल 760 किमी.
- अंबाई Tank 0.2 किमी.
- Pratik Joshi, Indraprastha Appts. 0.2 किमी.
- Mathura So.(Harshad , Pankaj & Prasad)House. 0.3 किमी.
- ANKLIKARS HOME 0.6 किमी.
- करवीर तालुका 3.4 किमी.