न्यू पॅलेस (कोल्हापूर)

India / Maharashtra / Kolhapur / कोल्हापूर / Bavda Road
 Upload a photo

भारतात म्हैसूर व कोल्हापूरचा दसरा प्रसिद्ध आहे. विजयादशमीदिवशी सायंकाळी सव्वासहा वाजता राजघराण्यातील श्रीमंत छत्रपती शाहू महाराज , युवराज संभाजीराजे , मालोजीराजे यांच्या उपस्थितीत सोने लुटण्याचा सोहळा पाहण्यासाठी हजारो करवीरकर उपस्थित असतात. न्यू पॅलेसवरून महाराजांची शानदार सवारी जर्मन मेबॅक कारमधून येते.राजर्षी शाहू महाराजांना कारचा मोठा शौक होता. तो छत्रपती राजाराम महाराजांनीही जोपासला. १९३२ मध्ये जर्मन बनावटीची मेबॅक कार महाराजांनी ऑर्डर देऊन लंडनमधून खरेदी केली. संस्थानाच्या ध्वजाचा रंग केशरी असल्याने केशरी रंगाच्या कारची ऑर्डर देण्यात आली. बॉनेटच्या पुढे महालक्ष्मी मूर्ती असून , कारच्या मधल्या हेडलाईटवर भवानी माता शिवरायांना तलवार देते , असे संस्थानाचे चिन्ह कंपनीकडून तयार करवून घेतले. टिंटेड काच असलेल्या मेबॅकमध्ये स्पीडॅमीटर किलोमीटरऐवजी मैल परिमाणाचे आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   16°43'10"N   74°13'56"E
  •  215 किमी.
  •  305 किमी.
  •  376 किमी.
  •  437 किमी.
  •  516 किमी.
  •  530 किमी.
  •  544 किमी.
  •  617 किमी.
  •  689 किमी.
  •  741 किमी.
This article was last modified 9 वर्षांपूर्वी