लाल महाल (लालमहालाला साडेतीनशे वर्षे पूर्ण) (पुणे)

India / Maharashtra / Pune / पुणे
 महाल, ऐतिहासिक

लाल महालाला येत्या १८ एप्रिल रोजी ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने ' लालमहाल शिवतेज दिन ३५० ' समितीतर्फे १६ ते १८ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि निबंध स्पर्धेचे आयोजन १६ एप्रिल रोजी करण्यात आले आहे. लालमहालात होणाऱ्या या स्पर्धेमध्ये पाचवी ते दहावी आणि सातवी ते दहावी या वयोगटातील विद्यार्थ्यांना सहभागी होता येणार आहे. त्याच दिवशी पुण्यश्लोक जिजाऊ वंदन शोभायात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. तांबडी जोगेश्वरी मंदिर ते लालमहाल दरम्यान ही शोभायात्रा होणार आहे. १७ एप्रिल रोजी दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. लालमहालात सकाळी ११ ते दुपारी एक यावेळेत ही स्पर्धा होणार आहे. शिवरायांचे युद्ध नेतृत्व या विषयावर निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे आणि इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांचे शनिवारवाडा येथे भाषण होणार आहे. १८ एप्रिल रोजी नवा काळ भैरवनाथ मंदिर ते कसबा पेठ या दरम्यान पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. त्याच दिवशी लाल महालातील शिवतांडव हे महानाट्य शनिवारवाडा येथे सादर होणार असल्याचे समितीचे सहकार्यवाह मुकुंद चव्हाण यांनी सांगितले.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°31'7"N   73°51'23"E

प्रतिक्रिया

  •  15 किमी.
  •  118 किमी.
  •  173 किमी.
  •  328 किमी.
  •  474 किमी.
  •  573 किमी.
  •  700 किमी.
  •  742 किमी.
  •  820 किमी.
  •  878 किमी.
This article was last modified 12 वर्षांपूर्वी