ताडोबा व्याघ्र प्रकल्प,Tadoba Lake | region

India / Maharashtra / Bhadravati /
 Upload a photo

world famous for tigers
देशातील व्याघ्र राजधानी म्हणून ओळखल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात उन्हाळी सुट्टीनिमित्त पर्यटनाला येणा-यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. येत्या एक मे पासून ताडोबा व्याघ्र प्रकल्पासाठी तब्बल ५०० रुपये प्रवेश शुल्क आकारण्याचा निर्णय प्रकल्प व्यवस्थापनाने घेतला आहे.

उन्हाळ्याच्या दिवसांत वाघ जंगलात अधिक खुलेपणाने वावरत असल्याने तसेच सुट्ट्यांचा हंगाम असल्याने या कालावधीत ताडोबा येथे व्याघ्रदर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या चार ते पाच पटींनी वाढते. सध्या याठिकाणी प्रतिव्यक्ती २२ रुपये, प्रत्येक वाहनामागे ५५ रुपये आणि कॅमेऱ्यापोटी दहा रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येते. मात्र, एक मे पासून सरसकट पाचशे रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय प्रकल्प व्यवस्थापनाने घेतला आहे.

ताडोबा प्रकल्पाचे वाढते महत्त्व पाहून ही दरवाढ करण्यात आली असली तरी याचा पर्यटकांच्या संख्येवर विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी भीती पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे. पर्यटकांची संख्या वाढत असल्याने ताडोबा प्रकल्पाची आथिर्क उलाढाल चार कोटींच्या घरात गेली आहे. त्यामुळे शुल्क वाढवण्याचा निर्णय योग्य नसल्याचे वन्यजीव प्रेमींचे म्हणणे आहे.
Nearby cities:
Coordinates:   20°20'19"N   79°17'39"E

Comments

  • Don't swim in the lake unless you want to eaten by a croc ! Survivors will be prosecuted !
  • It`s Just a great place there is a tigers area on the banks of the lake do not enter there are many crocodiles!!!
This article was last modified 13 years ago