Lake Billv - Reservoir of Dam near Nandgaon on Darna River

India / Maharashtra / Ghoti /
 reservoir  Add category
 Upload a photo

Darna water reservoir, also see deom the Nasik Igatpuri railway.

सन १८९२ साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला. त्या दुष्काळाची झळ नगर जिल्ह्यला मोठय़ा प्रमाणावर बसलेली होती. तत्कालीन ब्रिटिश सरकारने गोदावरीच्या खोऱ्यात धरणे बांधायचे धोरण अंगिकारले. त्यानुसार दारणा नदीवर नांदगाव इथे धरण बांधायचे निश्चित झाले. १९०७ साली इथे धरण बांधायला सुरुवात झाली आणि १९१२ ला हे धरण बांधून तयार झाले. त्यासाठीचा खर्च त्याकाळी जवळजवळ २७ लाख रुपये इतका होता. या सर्व कामावर देखरेख करायला एच. एफ. बिल हे सुपरिटेंडेंट इंजिनीयर होते. त्यांनी दुष्काळ निवारणार्थ केलेल्या पाटबंधाऱ्याच्या कामात हे सर्वात पहिले काम. त्याप्रीत्यर्थ या जलाशयाला ‘लेक बिल’ असे नाव दिले गेले. दारणेच्या या जलाशयामुळे कित्येक गावांना त्याचा फायदा झालेला आहे. मोगरे, उभाडे, बेलगाव तरळे, मुरंबी, माळुंजे अशी कित्येक गावे दारणेमुळे सुखावलेली आहेत. या लेक बिल जलाशयाचा फुगवटा खूप मोठा आहे.
Nearby cities:
Coordinates:   19°45'52"N   73°43'29"E
This article was last modified 6 years ago