.नंदनवन मतिमंद मुलांची कर्मशाळा, लक्ष्मीनगर व व्यवसाय शिक्षक प्रशिक्षण केेंद्र लक्ष्मीनगर ..अखेर लेखापाल रामेश्वर गीते निलंबित (नागपूर)

India / Maharashtra / Nagpur / नागपूर
 Upload a photo

.......अखेर लेखापाल रामेश्वर गीते निलंबित
आपल्या अधिकाराचा गैरवापर करत अनेक कर्मचारयांच्या अवैध नियुक्त्या केल्याबद्दल तसेच आर्थिक घोटाळ्यात अडकल्यावर नंदनवन येथील मतिमंद मुलांच्या शाळेतील लेखापाल रामेश्वर गीते यांना व्यवस्थापनाने अखेर निलंबित केले. मातृसेवा संंघाने प्रशासकीय अधिकारी म्हणून रामेश्वर गीते यांना नंदनवन मतिमंद मुलांची शाळा सीताबर्डी, नंदनवन मतिमंद मुलांची कर्मशाळा लक्ष्मीनगर व व्यवसाय शिक्षक प्रशिक्षण केेंद्र लक्ष्मीनगर या ३ संस्थाचे प्रशासकीय कामकाज सोपविले होते. मागील सात-आठ वर्षांपासून रामेश्वर गीते व शाळाप्रमुख डॉ. स्मिता चाटे यांनी या तीन संस्थामध्ये स्वतःच्या फायद्यासाठी १८ ते २० कर्मचारयांच्या अवैध नियुक्त्या केल्या होत्या. कर्मचारयांची नियुक्ती धोरणात्मक बाब असूनही मातृसेवा संघाच्या कार्यकारिणीची मंजुरी घेतली नव्हती. अनेक पदे रिक्त असल्याचे भासवून अनेकांना अवैध नियुक्त्या दिल्या. धर्मेंद्र दाभाडे याची मदतनीस पदावरील नेमणूक ५ वर्षापूर्वीची असल्याचे दाखवून व खोट्या हजेरया दाखवून वेतन लाटण्याचा प्रयत्न केला. नंदनवन शाळेत शिक्षकाची १५ पदे मंजूर असताना १६ पदांची मान्यता मिळविण्यासाठी खोटी कागदपत्रे तयार केली. अवैधपणे नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारयांना मागील ४-५ वर्षापासून भूलथाप देत मान्यता मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांची फसवणूक करीत असल्याची बाब समोर आली आहे. तसेच व्यवसाय प्रशिक्षण केंद्र लक्ष्मीनगर येथे मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार असल्याचे कार्यकारिणीस आढळले आहे. कार्यकारिणीच्या आदेशाची पायमल्ली करत भ्रष्टाचार सुरू असल्यामुळे विविध संस्था संघटनांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यासंदर्भात बोलावण्यात आलेल्या शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीला रामेश्वर गीते गैरहजर राहीले व केलेल्या सर्व गैरव्यवहाराची जबाबदारी स्विकारल्याचे पत्र दिले आहे. मातृसेवा संघासारख्या सेवाभावी संस्थेला गैरव्यवहार व फसवणुकीद्वारे अडचणीत आणणारया रामेश्वर गीते यांना निलंबित करण्याचा ठराव १४ जून रोजी कार्यकारिणी समितीच्या विशेष सभेत घेण्यात आला. अवैध नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचारयांना संरक्षण देता येत नसल्यामुळे त्या कर्मचारयांना देखील सेवामुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात शाळाप्रमुख चाटे यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी अशी मागणी संघटनेच्या विविध पदाधिकारयांतर्फे करण्यात
आली असल्याचे अपंग शाळा कर्मशाळा, संलग्न वसतीगृह कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष नरहरी माने यांनी कळविले आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   21°7'34"N   79°4'1"E
  •  20 किमी.
  •  124 किमी.
  •  258 किमी.
  •  259 किमी.
  •  291 किमी.
  •  374 किमी.
  •  525 किमी.
  •  544 किमी.
  •  699 किमी.
  •  885 किमी.
This article was last modified 13 वर्षांपूर्वी