Digambar Jain Mandir (Jain Temple) (नागपूर)

India / Maharashtra / Nagpur / नागपूर
 जैन मंदिर  गट निवडा

२४ वे तीर्थंकर भगवान महावीर
यांच्या वैचारिक संस्कृतीला श्रमण संस्कृती
म्हटले जाते, ज्यामध्ये समता आणि श्रमवादी विचारधारा
समाविष्ट आहे.
बिहारमधील वैशाली या नगरातील कुंडग्राम येथे
महावीरांचा जन्म ५९९ इसवी सनपूर्व चैत्र शुक्ल
त्रयोदशीला झाला. वैशाली वज्जी गणतंत्राची राजधानी
होती. त्यांचे वडील ज्ञातृकुलीय लिच्छवी क्षत्रिय राजा
सिद्धार्थ होते. त्यांची माता त्रिशलादेवी होती, ती विदेह
राजाच्या चेटकाची कन्या होती. मिथीला आणि विदेहचे
राजकीय संबंध कालांतराने आध्यात्मिक संबंधात
परिवर्तित झाले. महावीरांचा जन्म होताच समृद्धीचे युग
आले म्हणून त्यांचे वर्धमान नामकरण झाले. तेजस्वी
बालक वर्धमान बालपणापासून प्रतिभावान होते. म्हणून
त्यांना कोणत्याही गुरूची आवश्यकता नव्हती. ते
बालपणापासून शक्तिशाली व साहसी राजकुमार होते.
जवळपास आठ वर्षांच्या अवस्थेत त्यांनी एक दिवस
खेळता-खेळता भयानक भीमकाय सापाची शेपटी
पकडून त्याला पुष्कळ दूर फेकून दिले. तेव्हापासून त्यांना
महावीर म्हणू लागले. जीवनाच्या विविध प्रसंगांतील
कारणांमुळे त्यांना वीर, सन्मती व अतिवीर म्हटल्या
जाते. भगवान महावीरांच्या
आधी २३ तीर्थंकर झाले.
भगवान महावीरांच्या आधी
जवळ जवळ ५० वर्षांपूर्वी २३
वे तीर्थंकर पाश्र्वनाथ झाले.
पाश्र्वनाथ व महावीर ऐतिहासिक
महापुरुष होते. बावीसवे तीर्थंकर
नेमीनाथ हे श्रीकृष्णाचे चुलत भाऊ
होते. ऐतिहासिक दृष्टीने महावीर जैन
धर्माचे संस्थापक तर नाही, प्रवर्तक
सुद्धा नव्हते. प्रथम तीर्थंकर आदिनाथ
यांच्यापासून सुरू झालेल्या परंपरेचे
प्रचारक व प्रसारक होते. तीर्थंकर
महावीर भारतीय संस्कृतीचे उपासक
होते. त्यांनी अहिसेचा महामंत्र दिला.
विशेषत: बिहार व त्याच्या
जैन धर्माचा विकास मध्यदेश
आजूबाजूच्या क्षेत्रात झाला
आहे. मात्र त्याचा प्रचार-प्रसार
भारतातच राहिला. महावीरांच्या
काळात जैन धर्माची लोकप्रियता
बरीच वाढली. त्यांच्या संघात
व्रतींची संख्या जवळपास सहा
लाख होती. यामध्ये जे
महावीरांच्या विचारधारेचे प्रशंसक व
संवाहक राहिले असतील, अशा
लोकांची मोजदाद नव्हती. जैन धर्म
उत्तरेकडून दक्षिणेकडे महावीरांच्या
पहिलेच गेला होता. आंध्र, उत्कल,
महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ व
कर्नाटकात महावीरांच्या नंतर या
धर्माला जास्त लोकप्रियता मिळाली.
ऋषभदेवांनी सुवर्णभूमी, इराण
(पन्हव) इतर देशांचे भ्रमण केले.
पाश्र्वनाथ नेपाळला सुद्धा गेले होते. अफगाणिस्तानात
जैन धर्माच्या अस्तित्वाचे प्रमाण मिळतेच. श्याम,
कांबुज, चंपा, बल्गेरिया या देशात जैन धर्माचे अस्तित्व
आढळते.
जैन धर्माला राजाश्रय जरी मिळाला नसला, तरी
जनाश्रय अवश्य मिळाला आहे. हे सत्य आहे की,
त्याला अनेक भीषण घात-प्रतिघात सहन करावे लागले.
तरी सुद्धा आपल्या आचारनिष्ठेमुळे त्याचे अस्तित्व संपू
शकले नाही. चारित्रिक दृढता, पूर्ण शाकाहारी वृत्ती व
अहिसक जीवनपद्धतीने जैनधर्माला भारताच्या बाहेर
जाण्यापासून रोखले. परंतु, जन्मभूमीत राहून जैनाचार्यांनी
व्यक्ती, समाज व राष्ट्राच्या विकासात योगदान दिले
आणि ते अविस्मरणीय आहे. असे कोणतेच क्षेत्र नसावे,
ज्यामध्ये जैन आचार्यांचे विशिष्ट योगदान नसेल.
जैन धर्माची अहिसा भित्र्यांची नव्हती, तर वीरांचे
आभूषण होते. जैनांनी ज्याप्रमाणे जीवन जगण्याची कला
शिकविली, त्याप्रमाणे मरण्याची कलाही शिकविली.
मृत्युजवळ पूर्णपणे निरासक्त होऊन जा व निराहारी
होऊन मृत्यूचे स्वयंवरण करा, हे शिक्षण जैन धर्माने
दिले. त्याला सल्लेखणा म्हटले जाते.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   21°7'16"N   79°3'38"E
  •  20 किमी.
  •  123 किमी.
  •  258 किमी.
  •  259 किमी.
  •  290 किमी.
  •  374 किमी.
  •  525 किमी.
  •  544 किमी.
  •  700 किमी.
  •  884 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी