Wikimapia is a multilingual open-content collaborative map, where anyone can create place tags and share their knowledge.

Anand Sagar

India / Maharashtra / Shegaon / Balapur road

It is a lake.स्वच्छता व्यवस्थापन शेगाव संस्थानच
भारतीय संस्कृतीत त्याग व पावित्र्य या दोन्ही गोष्टींना महत्त्वाचे स्थान आहे. पूजा व स्वच्छता ही दोन्ही त्याची रूपं आहेत.
स्वच्छता व पूजा ही दोन्ही एकमेकांशी निगडित आहेत. परिसर स्वच्छ असला की, मन प्रसन्न होते. भक्तांच्या मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी मंदिराच्या परिसराची अखंड स्वच्छता ठेवण्याचे महत्कार्य श्री गजानन महाराज संस्थान शेगाव करते, याची परिसरात पदोपदी जाणीव होते. श्री महाराजांच्या दर्शनासाठी व प्रसादासाठी लाखो भक्त वर्षभर, महाराष्ट्राच्या कानाकोपरयातून व देशाच्या अनेक भागांतून येत असतात. श्रींचे दर्शन व कृपाप्रसाद घेऊन निघून जातात. जाताना सर्वजण संस्थानच्या व्यवस्थेची व स्वच्छतेची
तोंडभरून स्तुती करतात. ते ऐकताना विदर्भातील भक्तांचा ऊर भरून येतो. संस्थानच्या प्रकल्पांमध्ये ‘स्वच्छता' ठळकपणे दिसून येते. संस्थानचा प्रसादकक्ष जेवढा स्वच्छ व निर्मळ असतो तेवढेच कोठीघरही सुव्यवस्थित व स्वच्छ असते. ‘सांगून
कुणी येत नाही, तरीही रोज हजारोंनी भक्त दर्शन व प्रसाद घेऊन तृप्त होतात.' त्याची व्यवस्था व सतत स्वच्छता राखणे कठीण काम आहे. श्रीकृपेने संस्थान ही व्यवस्था सांभाळते. गरुडझेप घेणारयाला आकाशाचं ओझं नसतं. राहण्याच्या व्यवस्थेपासून तर दर्शनबारीपर्यंत... सर्वत्र स्वच्छतेचं चांदणं शिपडण्याचा संस्थानचा प्रयत्न अतुलनीय आहे. श्रींचा दरबार स्वच्छ असावा व भक्तांच्या पायाला घाण लागू नये, ही भावना! त्यासाठी सेवक-सेवाधारींचे हात झाडू, पोछा घेऊन जमिनीवरून फिरत असतात. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नियोजनबद्ध असून, सर्वांना शुद्ध व गाळलेले पेयजल मिळते. प्रांगणातील फुलांची दुकाने तसेच मिठाई, प्रसाद विकणारया किवा इतर दुकानांच्या सभोवतालच्या स्वच्छतेची काळजी घेतली जाते. पादत्राणांमुळे घाण पसरू नये म्हणून भक्तांची पादत्राणे विनामूल्य सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था आहेच. भक्तांना काही सूचना करावयाच्या असतील, तर सेवेकरी पेन- रजिस्टरसह तत्पर असतो. इतकेच काय, समाधिदर्शन किवा मुखदर्शन करून बाहेर पडण्यापूर्वी प्रत्येक हातावर प्रसादाचा लाडू व प्रसाद जमिनीवर पडू नये म्हणून व्यवस्थित कागदाच्या पाकिटातून ठेवण्यात येतो. संस्थान राखत असलेल्या सर्वांग-स्वच्छतेचा परिचय भक्तांना नित्य होतो. स्वच्छतेच्या या सेवेतून जणू भक्तीचे नऊही प्रकार एकविध होऊन जातात. आज घरी-दारी, समाजात सर्वत्र स्वच्छतेची
गरज आहे. स्वच्छतेवर नुसता उपदेश न देता स्वत:पासून सुरुवात करणारे श्री संत गाडगेबाबा डोळ्यासमोर येतात. जादूसारखं, आयुष्य बदलवून टाकणारं नवीन तंत्रज्ञान रोज येतंय्. परंतु स्वयंशासनातून व विशुद्ध सेवाभावातून करण्यात व राखण्यात येणारी स्वच्छता व तिचे महाव्यवस्थापन म्हणजे शेगाव संस्थानचे ‘आदर्श' उदाहरण आहे. रोज हजारो लोकांचा मंदिरात दर्शनासाठी प्रवेश
असतो. विशेष वार्षिक कार्यक्रम असले की, त्या दिवसात करोडो लोक दर्शन व प्रसाद घेऊन धन्य होतात. आनंदसागरचे मनोरम उद्यान गर्दीने फुलले असते. यामुळे परिसर अस्वच्छ होणे क्रमप्राप्त आहे. स्वच्छतेकडे संस्थान अजीबात दुर्लक्ष होऊ देत नाही. स्वच्छतेसंबंधी कुठलीही सबब संस्थानच्या व्यवस्थेच्या आड येत नसावी. संस्थानचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय विश्वस्त, विश्वस्त व समस्त हजारो सेवेकरयांची श्रींवरील आस्था व संस्थान करीत असलेली व्यवस्था हा आज सर्वांच्या कुतुहलाचा विषय आहे. शासनाने
मंजूर केलेला शेगाव शहर विकास आराखडा हा संथगतीत अडकला असल्यामुळे, शेगाव रेल्वेस्टेशन ते श्रींच्या मंदिरापर्यंत घाण, धूळ,
पाहून नागरिकांना स्वच्छतेसाठी मंदिरात अहोरात्र सेवा देणारया पवित्र हातांची व आदर्श सेवाभावाची आठवण होते. संस्थानच्या
व्यवस्थेच्या वाटचालीला एक दिशा आहे. ‘स्वच्छता' त्याच्या मुळाशी आहे. भक्तांना त्रास न होता सुखद दर्शन व्हावे, ही संस्थानची ‘सर्व मांगल्य-स्वयंप्रभ' व्यवस्था आहे. श्रींच्या भक्तांची यथायोग्य सेवा व्हावी ही शिकवण, समाधानी, परोपकारी, कर्तव्यनिष्ठ व निर्मळ अंत:करणाचा सेवेकरी यावर संस्थानने लक्ष दिले आहे. सेवेने जीवनमूल्ये सुवर्णमयी झालीत. कर्म
ईश्वराभिमुख झाले आहे. जेथे मूल्ये सजतात तेथे सत्कर्मे बहरतात. संस्थानने घालून दिलेल्या वस्तुपाठामुळे येणारा भक्तही तसाच वागू लागतो. संस्थानचे हे कार्य समाजासाठी दिशादर्शक आहे. श्री महाराजांच्या दरबारात स्वच्छता व पावित्र्याचा प्रवाह सत्त्वप्रधान होऊन राहतो. स्वच्छता असली की मनात पवित्र व मंगल विचार येतात. स्वच्छतेने तनामनाचे कोपरे शुद्ध होतात. स्वच्छता व पवित्रतेने मनाची भावजागृती होते. मनाला प्रसन्नता व आल्हाद देणारया स्वच्छतेची मशागत संस्थान करीत असते. जिथे स्वच्छता तिथे ईश्वराचा वास असतो. आणि.... भावभक्ती, श्रद्धा, पूजा व निर्मळ स्वच्छता यातून परब्रह्म सच्चिदानंद भक्तप्रतिपालक शेगावनिवासी श्री गजानन महाराज चिरंजीव समाधीमधून कृपादान देण्यासाठी प्रगट होतात. शेगाव संस्थानची ही अविरत सेवा, शुचिता, निर्मलता, भक्तांना श्रीकृपेचा अखंड आनंद देते... ‘आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदची अंग आनंदाचे!'
Nearby cities:
Coordinates:   20°46'32"N   76°41'38"E

Comments

  • matesunil21gmail.com (guest)
    i Love shri gajanan maharaj,heartly, "GANI GAN GANAT BOTE"
  • subhashsable93yahoo.com (guest)
    i love sant gajanan maharaj gan gan ganat bote
  • dpatidar.anna (guest)
    i love gajanan maharaj & anand vihar
  • subhash dhore (guest)
    i love gajanan maharaj jai gajanan maharaj
  • chetan sapkale (guest)
    jai gajanan maharaj but now shegaon mandir & aanand sagar serices very bad and poor quality please grow up very well services try it
This article was last modified 11 years ago