चवदार तळे,महाड (महाड)

India / Maharashtra / Mahad / महाड
 स्मारक (मोन्यूमेंट), तळे
 Upload a photo

'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्पर्शाने इतिहासात नाव नोंदले गेलेले महाडचे चवदार तळे पुन्हा एका 'चवदार' झाले आहे. वाढते नागरिकीकरण आणि निवासी वस्तीतून झिरपणाऱ्या सांडपाण्यामुळं दूषित झालेलं चवदार तळ्याचं पाणी पिण्यालायक झालं आहे. बायोसॅनिटायझर या नैसर्गिक उत्प्रेरकाच्या सहाय्याने तळ्याच्या शुद्धीकरणाचे काम करण्यात आलं आहे.
नाशिकच्या भारद्वाज इकोटेक संस्थेसाठी काम करणारे पर्यावरण तज्ज्ञ गुणवंत पाटील यांनी याकामी पुढाकार घेतला होता. नगरपालिका व राज्य सरकारच्या सहकार्याने चवदार तळ्याच्या शुद्धीकरणाचा प्रकल्प राबवला गेला. अवघ्या १५ लाखांमध्ये तो पूर्णही झाला. पुण्याचे शास्त्रज्ञ डॉ. उदय भवाळकर यांनी ४० वर्षे संशोधन करून निर्मिलेल्या बायोसॅनिटायझर या नैसर्गिक उत्प्रेरकाच्या सहाय्याने तळ्याच्या शुद्धीकरणाचे काम करण्यात आले, अशी माहिती गुणवंत पाटील यांनी दिली. रायगडचे पूर्व जिल्हाधिकारी होनाजी जावळे यांनीही यासाठी मेहनत घेतली. बदली होण्यापूर्वी जावळे यांनी त्या कामाची मंजुरी करून घेतली. तब्बल दोन महिने शुद्धीकरणाची प्रक्रिया चालली.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°4'53"N   73°25'7"E
  •  66 किमी.
  •  131 किमी.
  •  223 किमी.
  •  362 किमी.
  •  513 किमी.
  •  571 किमी.
  •  688 किमी.
  •  719 किमी.
  •  787 किमी.
  •  863 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी