' वेरुळ- अजिंठा अभ्यागत केंद्र ' ( व्हिजिटर्स सेंटर)

India / Maharashtra / Soyagaon /
 बगीचा, विशेष जागा

अजिंठा-वेरुळ लेणीतील शिल्प आणि चित्रकलेच्या संवर्धनासाठी लेणीची प्रतिकृती असलेले ' वेरुळ- अजिंठा अभ्यागत केंद्र ' ( व्हिजिटर्स सेंटर) लवकरच पर्यटकांच्या सेवेत सुरू होणार आहे. तब्बल ११० कोटी रुपये खर्च करुन ही दोन्ही केंद्रे उभारण्यात आली आहेत. भविष्यात आकर्षक पर्यटक केंद्र म्हणूनही उदयास येणार आहेत. अजिंठा लेणीपासून चार किलोमीटरवर अभ्यागत केंद्र आहे. भारताच्या श्रीमंत सांस्कृतिक वारशाचे हे प्रतीक आहे. घोड्याच्या नालीसारख्या आकारात अजिंठा लेणी वाघूर नदी परिसरात विखुरली आहे. नदीपात्रापासून १५ ते ३० मीटर उंचीवर लेणी आहेत. पर्यटकांच्या वाढत्या संख्येमुळे एक , दोन , सोळा आणि सतरा क्रमांकाच्या लेणीमध्ये भगवान गौतम बुद्धांच्या अनुयायांनी निर्माण केलेली शिल्प व चित्रं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यटकांच्या श्वासोच्छवासामुळे शिल्प आणि चित्रावर दुष्परिणाम परिणाम होत असून त्यांची झपाट्याने झीज होत असल्याचा अहवाल तज्ज्ञांनी दिला. पर्यटकांचा ताण कमी करण्यासाठी लेणीची हुबेहुब प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. बॉल्टेनिक खडकांमध्ये छन्नी आणि हातोड्याच्या सहाय्याने निर्मिती केलेल्या भगवान बुद्धांच्या विविध मुद्रांमधील प्रतिमा आणि चित्रांवर पावसाचे पाणी झिरपत असल्याने नुकसान होत आहे. या प्राचीन वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने या प्रतिकृती तयार करण्यात आल्या आहेत. सुमारे ६१.६० कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प अत्यंत देखणा आणि आकर्षक आहे. पाच म्युझियम , चार लेणींच्या प्रतिकृती , थिएटर , अभ्यास केंद्र , रेस्टॉरंटचा प्रकल्पात समावेश आहे. ४५ हजार चौरस मीटरच्या लँडस्केप जागेवर १५ हजार चौरस मीटरवर हा प्रकल्प उभारला आहे. ' सायक्लोरामा ' ही अभिनव संकल्पना प्रकल्पात राबवण्यात आली आहे. दुमजली घुमटाकार इमारतीत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनातील प्रसंग , जातककथा , लेणीची माहिती आणि अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने याचा सुंदर संगम प्रकल्पात झाला आहे. तसेच , पर्यटकांसाठी आरामदायी आसनव्यवस्था आहे. जगातील प्रमुख भाषेत लेणींचा इतिहास आणि माहिती मिळणार आहे. कल्चरल प्लाझा , गॅलरी , प्रदर्शन केंद्र , मल्टिमीडिया ऑडिटोरियम , गाइड पोस्ट आदी आकर्षणे असणार आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी एक प्रशस्त रेस्टॉरंट , शॉपिंग कोर्ट , उद्यान , एक्सलेटर आणि लिफ्टच्या सुविधा असतील.
संपूर्ण बांधकामाला प्राचीन बांधकामाचे रुप दिले आहे. बौद्ध , जैन आणि हिंदू धर्माचा अनोखा संगम वेरुळ लेणीमध्ये आहे. या लेणी महाराष्ट्राचे वैभव आहेत. ३८ कोटी ६२ लाख रुपये खर्च करुन अभ्यागत केंद्र उभारण्यात आले आहे. कैलास लेणीची प्रतिकृती यात आहे. कैलास लेणे म्हणजे वेरुळ लेणीतील मुकूटमणी आहे.
वेरुळ अभ्यागत केंद्र
१२ हजार चौरस मीटर
तीन म्युझियम
कैलाश मंदिराची प्रतिकृती
१४२ कार , ४१ बस आणि १९९ दुचाकी वाहनांची पार्किंग व्यवस्था
तीन रेस्टॉरंट
ऑडिटोरियम आणि अॅम्फी थिएटर
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   20°33'54"N   75°43'28"E
  •  219 किमी.
  •  303 किमी.
  •  322 किमी.
  •  326 किमी.
  •  422 किमी.
  •  655 किमी.
  •  836 किमी.
  •  915 किमी.
  •  1012 किमी.
  •  1023 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी