पाटणराणीची विहीर

India / Gujarat / Patan /
 विशेष जागा, युनेस्को जागतिक वारसा स्थान, 11th century construction (en), बारव

पूर्वीच्या सोळंकी घराण्याचं हे राजधानीचं शहर होतं. सध्या हे प्रसिद्ध आहे पाटणराणीची विहीर आणि पटोला साड्यांसाठी. इथं वैशिष्ट्यपूर्ण पायऱ्यांची (स्टेपवेल) देखणी विहीर आहे. पाटणच्या राणीनं ती बांधली म्हणून तिला राणीची वाव म्हणतात. ही विहीर भीमदेव साळुंके (पहिला) या राजाच्या स्मरणार्थ बांधली गेली. भीमदेवाची विधवा राणी उदयमतीनं ती बांधून पूर्ण केली. इ.स. १०५० च्या कालावधीत तिचं बांधकाम झालं असावं. फार पूर्वी सरस्वती नदीला आलेल्या पुरामूळे ती चिखलात गाडली गेली होती. साधारणपणे १९८० च्या सुमारास भारतीय पुरातत्त्व विभागाला एका उत्खननात या विहीरीचा शो‌ध लागला. आता युनेस्कोनं तिला जागतिक वारसा हक्क प्रदान केलाय. नऊ मजले खोलीची ही वाव आहे. प्रत्येक मजला कोरीवकामाच्या देखण्या कलाकुसरीनं समृद्ध आहे. त्या काळी कोणतीही साधनं किंवा खोदकामाचं अद्ययावत तंत्रज्ञान नसताना दगडातही इतकं नाजूक नक्षीकाम केलंय, याचं राहून-राहून आश्चर्य वाटतं.
असं म्हणतात, की या विहीरीच्या तळाशी एक भूयार असून, ते तीस किलोमीटर लांब सिद्धपूरला निघतं. कदाचित तो संकटकालीन गुप्त मार्ग असावा. सध्या मात्र ते बंद आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   23°51'32"N   72°6'6"E
  •  89 किमी.
  •  97 किमी.
  •  177 किमी.
  •  179 किमी.
  •  212 किमी.
  •  218 किमी.
  •  225 किमी.
  •  264 किमी.
  •  294 किमी.
  •  311 किमी.
Array
This article was last modified 10 वर्षांपूर्वी