कैलास स्मशानभूमी,माहुली (Mahuli Sangam)

India / Maharashtra / Satara / Mahuli Sangam
 स्मशानभूमी  गट निवडा
 Upload a photo

सातारा शहरासाठी माहुली ही एकमेव स्मशानभूमी आहे. अतिशय सुंदर आणि स्वच्छ अशा या श्मशानभूमीची जबाबदारी श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याकडे आहे. या ट्रस्टने येथे लाकडांपासून अंत्यसंस्कारावर बंदी घातली आहे. तेथील नागरिकही या हाकेला प्रतिसाद देत लाकडाऐवजी गोवऱ्यांचा वापर करीत आहेत. प्रदूषण करणारे केरोसिन, डिझेल, टायर आदीचा वापरावरही येथे बंदी आहे. त्यामुळेच हा स्मशानघाट स्वच्छ राहतो. उपराजधानीतही असा किमान एक घाट असावा, याकडे फाउंडेशनने लक्ष वेधले आहे. साताऱ्यातील या घाटावर गोवरी मोफत दिली जात नाही. गोवरीचा वापर केल्यामुळे खेडेगावातील शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. वृक्षतोड थांबल्यामुळे प्रदूषणावरही आळा बसला आहे. शिवाय, दिवसाकाठी वीस वर्षे वयाचे शंभरावर वृक्ष वाचविता येऊ शकतात. नागपुरात स्मशानघाटावर मोफत लाकडे दिली जातात. या लाकडांबाबतही भ्रष्टाचाराचा मोठा आरोप होत आहे. अनेक ठिकाणी ओली लाकडे दिली जात असल्याचा आरोप होत आहे. मनपा प्रशासनातर्फे ही सोय केली आहे. लाकडांचा पैसा कंत्राटदारांना दिला जातो. तरीही, अनेक मृतदेहांसाठी लाकडे हवी तेवढी मिळत नाहीत. त्यामुळेच गोवरीचा पर्याय पुढे आला आहे. आज अनेक श्मशानभूमी शहराच्या मधोमध आल्या आहेत. त्यातच लाकडाचा वापर व त्यासोबतच मृतदेह जाळण्यासाठी करण्यात येत असलेल्या इतर वस्तूंच्या वापराने प्रदूषण वाढत आहे. मृतदेहातून निघणारा धूर स्मशानभूमीच्या आजूबाजूच्या परिसरातील रहिवाशांसाठी धोकादायक आहे. आरोग्याचे प्रश्नही निर्माण झाले आहेत. तरीही, प्रशासनाकडून गोवरीच्या पर्यायावर विचार केला जात नाही. साताऱ्यातील प्रयोगाचा वापर केल्यास, जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना व बचतगटांना रोजगार उपलब्ध करून देता येईल. किंबहुना येथील वृक्षतोडीवरही काही प्रमाणात निर्बंध घालता येतील. हे शक्य नसेल तर श्मशानघाटांवर असलेली एलपीजी दाहिनीचाही वापर करता येणे शक्य असल्याचे पर्यावरणप्रेमी संघटनांचे म्हणणे आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   17°41'22"N   74°3'0"E
  •  106 किमी.
  •  201 किमी.
  •  267 किमी.
  •  422 किमी.
  •  444 किमी.
  •  612 किमी.
  •  649 किमी.
  •  649 किमी.
  •  726 किमी.
  •  789 किमी.
This article was last modified 11 वर्षांपूर्वी