Wikimapia is a multilingual open-content collaborative map, where anyone can create place tags and share their knowledge.

Nagewadi

India / Maharashtra / Satara /
 temple, village
 Upload a photo

This is native village of Vitthal Eknath Sawant.
Nagewadi is a famous for shakambhari temple.
Nearby cities:
Coordinates:   17°46'3"N   73°59'31"E

Comments

  • Vitthal Eknath Sawant (guest)
    नागेवाडी सातारा जिल्ह्यातिल व सातारा तालुक्यातिल नागेवाडी हे माझे गाव आहे। हे गाव पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ च्या कडेला व सातारा शहराच्या अलीकड़े दहा किलोमीटर वसलेले आहे। या गावामध्ये मुख्यतः सावंत कुटुम्बाचे लोक राह्तात। या गावाची लोकसंख्या अन्दाजे पाच हजाराच्या आसपास असावी। गावामध्ये ग्रामपंचायत आहे। पुर्वी ग्रामपंचायत ही जवळच्या लिम्ब गावामध्ये होती। लिम्ब गाव हे कृष्णा नदिकाठचे आमचे मूळ गाव आहे। परंतु या लिम्ब गावापसुन आमचे पूर्वज वेगळे झाले व त्यांनी आमचे नागेवाडी हे गाव वसवले। आमच्या नागेवाडी गावाचा आद्य पूर्वज म्हणून आम्ही वीर याना ओळखतो। ते जेव्हा लहान होते तेव्हाच त्यांचे आई वडिल वारले, अगदी लहान नागड्या वयापसुना त्याना त्यांच्या मामाने संभाळले म्हणून आमच्या गावाला नागड्याची वाडी नागेवाडी असे ओळखले जाउ लागले। ते जेव्हा मोठे जाले तेव्हा ते आपल्या मामाबरोबर लिम्ब गावी आले व आपला हिस्सा मागू लागले तेव्हा त्यांच्या भावूबंधानी एक पण ठेवला। पण असा होता कि ते पूढे पळतिल व त्यांच्या मागे त्यांचे भाउबंध पळतिल व जिथे ते भावूबंध त्याना पकडतील तेथपर्यन्तची जमीन वीर याना देन्यात येईल आसे ठरविण्यात आले। याप्रमाने शर्यत सुरु झाली परंतु वीर याना धावून पकड़न्यात अपयश आल्याने शेवटी त्याना घोड्यावरुन धावुन पकडण्यात आले। जेथे त्याना पकडण्यात आले तेथपर्यन्तची जमीन वीर याना देण्यात आलि। यामधेही ही शर्यत माळरानापासून चालू करण्यात आली व जेव्हा वीर चांगल्या म्हणजे मळरानामध्ये घुसू लागले तेव्हा त्याना घोड्यावरुन धावुन पकडण्यात आले। सबब वीर याना चांगली सुपिक जमीन मिळू शकली नही। नंतर वीर हे आपल्या कुटुम्बिया सहीत नागेवाडीस येवून राहू लागले। परंतु भावुबंधकिचे वैर काही संपले नही व शेवटी वीर याना पेरुच्या बागेमध्ये मारन्यात आले। नंतर बरीच वर्षे नागेवाडिच्या लोकाना सरकारी कामासाठी लिम्ब गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयात जावे लगायाचे। तसेच सर्व पंच हे लिम्ब गावाचे असल्यामुळे नागेवाडी गावाचा विकास होत नव्हता। हे पाहून नागेवाडी गावातील थोर स्वातंत्र्यसैनिक एकनाथ सीताराम सावंत यानी या कामी पुढाकार घ्यावयाचे ठरवून प्रथमच लिम्ब ग्रामपंचायत सभेच्या निवडणुकीत निवडून आले। नंतर त्यांच्याच प्रयत्नामुळे नागेवाडिस ग्रामपंचायत कार्यालय आले। ग्रामपंचायत कार्यालय झाल्यानांतर गावामध्ये शाळा व पोस्ट ऑफिस ही आले आणी या सर्वामुळे गावाचा झपाट्याने विकास होवू लागला। ..... अजून लिहायाचे बाकी आहे..... http://sawantve.blogspot.com/
This article was last modified 17 years ago