KADEPATHAR (Khandoba Shiv Temple)

India / Maharashtra / Jejuri / Kadepathar
 temple, mountain

'सदानंदाचा येळकोट', 'येळकोट, येळकोट जयमल्हार', 'खंडोबाच्या नावानं चांगभलं', अशी आरोळी अन् सोबत उधळलं जाणारं भंडार-खोबरं... हे चित्र दिसलं, की लोकदेव खंडोबा, मल्हारी, म्हाळसाकांताची आराधना सुरू आहे, हे लक्षात येईल. या मल्हारी-म्हाळसाकांताची अनेक स्थानं असली, तरी पंढरपूरचा विठोबा, कोल्हापूरचा जोतिबा अन् जेजुरीचा खंडोबा, हीच ओळख जन-मानसांत रुजली आहे. तरी, जेजुरगडाच्या मागे उंच डोंगरावर असलेलं कडेपठार (कऱ्हेपठार) हे खंडोबाचं मूळ स्थान आहे, याची माहिती फारशी नसते. जेजुरीचं दर्शन घेऊन आल्याचं सांगणाऱ्या भाविकांच्या चेहऱ्यावर 'कडेपठारचं मूळ स्थान पाहिलं का', असं विचारल्यावर मात्र 'हे काय नवीन,' अशी भावना दिसते. त्यामुळं जेजुरीला जाणाऱ्या भक्तांनी खंडोबाचं हे मूळ ठिकाण पाहायलाचं हवं. जेजुरीपेक्षा इथं पोहोचणे थोडं खडतर असलं, वाट थोडी अवघड असली, तरी देवाच्या आद्यस्थानाचं दर्शन त्यांना सुखावणारं असेल, यात शंका नाही.कडेपठाराच्या डोंगराच्या पायथ्याला वाहनतळ आहे. तेथून, पायऱ्यांची चढण पार करून आपण कडेपठारावरील मंदिराच्या मूळ प्रांगणात पोहोचतो. जेजुरीच्या तुलनेत मंदिर लहान असले, तरी आकर्षक आहे. या पूर्वाभिमुखी मंदिराच्या बाहेर मेघडंबरीत नंदी, तर पुढे कासव आहे. जेजुरीप्रमाणे या मंदिराचेही सोपा, सभामंडप आणि गाभारा, असे तीन भाग आहेत. गाभाऱ्यात पश्चिम भिंतीतल्या देवळीत खंडोबाची आसनस्थ मूर्ती आहे. बैठकीच्या डाव्या-उजव्या बाजूला मणि आणि मल्ल यांची मुंडकी. मूर्तीच्या हातात खड्ग, त्रिशूळ, डमरू आणि परळ अशी आयुधे. तर, देवळीसमोरील जमिनीवर दोन स्वयंभू, खडबडीत व अनियमित आकाराची खंडोबा व म्हाळसा यांची लिंगं आहेत. त्याशिवाय, खंडोबा व म्हाळसा आणि बाणाईच्या उभ्या मूर्तीही आहेत.




jejuri.net/kadepathar
"देवा तुझी सोन्याची जेजुरी"
www.jejuri.in
श्रीक्षेत्र जेजुरीची धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामजिक सर्वांगीण माहिती देणारे संकेतस्थळ
www.jejuri.in
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा...
जेजुरीची सचित्र माहिती आता एका क्लिक वर
सुवर्णनगरी जेजुरी -
www.jejuri.net
सुवर्णनगरी जेजुरी - श्री क्षेत्र जेजुरी येथील जेजुरी गड, कडेपठार खंडोबा मंदिरे तेथील देव देवता, यात्रा उत्सव यांची धार्मिक व ऐतिहासिक तसेच जेजुरी ची ऐतिहासिक सांस्कृतिक व भोगोलिक जैवविविधता, येथील व परिसरातील प्रेक्षणीय स्थळे मंदिरे, खंडोबा परिवार देवता पुजा प्रतीके कुलधर्म कुलाचार ग्रंथ उपासक, महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश मधील प्रमुख खंडोबा मंदिरे यांची सचित्र व चित्रफिती सह अभ्यास पुर्ण माहिती देणारे संकेत स्थळ

"देवा तुझी सोन्याची जेजुरी"
www.jejuri.in
श्रीक्षेत्र जेजुरीची तुळजापूरची धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामजिक सर्वांगीण माहिती देणारे संकेतस्थळ
www.jejuri.in
आपला अभिप्राय व सूचना संकेतस्थळावर जरूर नोंदवा...
जेजुरीची सचित्र माहिती आता एका क्लिक वर
khandoba-jejuri.blogspot.in/p/blog-page_09.html#kadepat...

कडेपठार भुपाळी -

www.youtube.com/watch?v=AkPBdb2mRQ4
कडेपठार धुपारती -

www.youtube.com/watch?v=s2GnxUnnfp4
कडेपठार शेजारती -

www.youtube.com/watch?v=X_1-j1vUcyQ

जेजुरीचा खंडोबा अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत या खंडोबाचे, जेजुरीचे दर्शन व्हावे.
हि सर्वांचे मनाची आस, आपल्या लाडक्या जेजुरीची सचित्र माहिती आता एका क्लिक वर
jejuri.net/kadepathar
चलातर जाऊया जेजुरीला
आपल्या मित्रांना, नातेवाईकाना, हि लिंक पोहचवा आणि निमंत्रित करा खंडोबाचे दर्शनाला
चला पोचवू
घरा घरात खंडोबा
मना मनात जेजुरी
येळकोट येळकोट जय मल्हार !!!!!!!!!!!




www.youtube.com/watch?v=vnp32bQ7Quk


www.youtube.com/watch?v=lVVhGh5ZkFc

Watch Swayambhu Ling Abhishek :

www.youtube.com/watch?v=juDbdcxBjZs&feature=fvst



नरहरी सोनार कृत
खंडोबाची आरती

जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार
मृत्यू लोकी दुसरे कैलास शिखर
नानापरीची रचना रचिली अपार
जये स्थळी नांदे स्वामी शंकर
जयदेव जयदेव जय श्री मार्तंडा स्वामी मार्तंडा
आरि मर्दन मल्हारी तुझी प्रचंडा जयदेव जयदेव !! 1 !!

मणी मल्ल दैत्य प्रबळ तो झाला
येउनी त्याने प्रलय मांडीला
न आटोपे कोणा स्मरणे मातला
देव गण गंधर्व कापती त्याला
जयदेव जयदेव जय श्री मार्तंडा स्वामी मार्तंडा
आरि मर्दन मल्हारी तुझी प्रचंडा जयदेव जयदेव !! 2 !!

चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिसी
मणी मल्ल दैत्यांचा संहार करिसी
चरणी पृष्ठी खडगे वर्मीसी
अंती वर देवूनिया मुक्तीसी नेसी
जयदेव जयदेव जय श्री मार्तंडा स्वामी मार्तंडा
आरि मर्दन मल्हारी तुझी प्रचंडा जयदेव जयदेव !! 3 !!

मणी मल्लदैत्य नामे मल्हारी
देवा संकट पडले जेजुरी
अर्धांगी म्हाळसा शोभे सुंदरी
देवा ठाये माझे दास नरहरी
जयदेव जयदेव जय श्री मार्तंडा स्वामी मार्तंडा
आरि मर्दन मल्हारी तुझी प्रचंडा जयदेव जयदेव !! 4 !!

---- नरहरी सोनार
(संकलन उपाध्ये गुरुजी. जेजुरी.)
Nearby cities:
Coordinates:   18°15'13"N   74°9'0"E

Comments

  • this is the jagrut devasthan.
  • Very Good Photography Of Mr GANESG TAk Jai Malahar
  • You have done good job by adding Khandoba Temple. Excellant. Keep it up! Massage By Adv. Dashrath Ghorpade At Post Kolvihire Tal. Purandar Dt. Pune Mb 9921126565
  • The plateau of Kadepathar is 11½ acres in extent, and, besides the older and more sacred temple of Khandoba it contains several other temples and shrines and houses occupied by priests and temple servants.
  • Any One Guys Have The Photo On Khandoba's Old & New Temple Please relised On Web Site Thamks (Jai Malhar,Shiv Malhar)
  • I have been since my child hood to jejuri khandoba, its a place where we can find ourselves.
  • हरहर महादेव..... चिंतामणी मोरया.......आनंदीचा उदे उदे भैरोबाचा चांगभले बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट....... येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय अगडधूम नगारा सोन्याची जेजुरी देव आले जेजुरा.... नीळा घोड़ा.... पायात तोडा.. कमरी करगोटा.... बेंबी हिरा... मस्तकी तुरा.... अंगावर शाल सदा ही लाल आरती करी म्हाळसा सुंदरी.... देव ओवाळी नाना परी खोब्रयाचा तुकडा..... भंडाराचा भड़का....... सदानंदाचा येळकोट....... येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय अड्कल के भड्कल....... भड्कल के भंडार....... बोल बोल हजारी.... वाघ्या मुरूळी....... खंडोबा भगत सलाम सलाम........ सदानंदाचा येळकोट....... येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय.......
  • नरहरी सोनार कृत खंडोबाची आरती जेजुरगड पर्वत शिवलिंगाकार मृत्यू लोकी दुसरे कैलास शिखर नानापरीची रचना रचिली अपार जये स्थळी नांदे स्वामी शंकर जयदेव जयदेव जय श्री मार्तंडा स्वामी मार्तंडा आरि मर्दन मल्हारी तुझी प्रचंडा जयदेव जयदेव !! 1 !! मणी मल्ल दैत्य प्रबळ तो झाला येउनी त्याने प्रलय मांडीला न आटोपे कोणा स्मरणे मातला देव गण गंधर्व कापती त्याला जयदेव जयदेव जय श्री मार्तंडा स्वामी मार्तंडा आरि मर्दन मल्हारी तुझी प्रचंडा जयदेव जयदेव !! 2 !! चंपाषष्ठी दिवशी अवतार धरिसी मणी मल्ल दैत्यांचा संहार करिसी चरणी पृष्ठी खडगे वर्मीसी अंती वर देवूनिया मुक्तीसी नेसी जयदेव जयदेव जय श्री मार्तंडा स्वामी मार्तंडा आरि मर्दन मल्हारी तुझी प्रचंडा जयदेव जयदेव !! 3 !! मणी मल्लदैत्य नामे मल्हारी देवा संकट पडले जेजुरी अर्धांगी म्हाळसा शोभे सुंदरी देवा ठाये माझे दास नरहरी जयदेव जयदेव जय श्री मार्तंडा स्वामी मार्तंडा आरि मर्दन मल्हारी तुझी प्रचंडा जयदेव जयदेव !! 4 !! ---- नरहरी सोनार (संकलन उपाध्ये गुरुजी. जेजुरी.)
  • Om shiv malhari jai jai malhari martand malhari jai jai malhari yelkot yelkot sadnandacha yelkot..........!"
  • महाराष्ट्राच्या या दैवताला कोटी कोटी प्रणाम
  • Show all comments
This article was last modified 8 years ago