श्री क्षेत्र पंढरपुर
India /
Maharashtra /
Pandharpur /
World
/ India
/ Maharashtra
/ Pandharpur
जग / भारत / महाराष्ट्र / सोलापूर
नगर क्षेत्र, तीर्थटन, हिंदू मंदिर, mandal headquarter (en)
मूळ पंढरपूर गाव हे चंद्रभागेच्या काठावर हरिदास , महाद्वार आणि कुंभार या तीन वेशीत वसलेले होते . विठ्ठल मंदिरासभोवतीचा प्रदक्षिणा रोड ही पंढरपूर गावाची सरहद्द . पंढरपूर गाव आदिलशाहीत असल्याने विजापूरच्या दिशेचा नदीकाठचा भाग आधी विकसित झाला . दत्तघाट , महाद्वार घाट , ते कालिका मंदिर हा रस्ता विजापूर रस्ता म्हणून प्रसिद्ध होता . तिथेच गावचा बाजार भरत असे .
पंढरपूर हिंदू धर्मीयांचे पवित्र तीर्थक्षेत्र . विजापूरचा आदिलशाहा , हैदराबादचा निजाम यांच्या आक्रमणाचा सततचा धोका लक्षात घेऊन इथल्या वाड्यांची रचना करण्यात आली आहे . गावाच्या बरोबर मध्यभागी , उंचवट्यावर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर आणि त्याच्या सभोवती बडवे , उत्पात , सेवाधारी आणि क्षेत्रोपाध्यांचे वाडे ! एकमजली वाड्याला भव्य दगडी कमान , त्याखाली दिंडी दरवाजा , दोन्ही बाजूला दगडी चौथरे , दरवाज्याला आतून लोखंडी साखळी व जाडजूड अडसर . समोर अंगण , त्यात न्हाणी घर व पाण्याचा मोठा हौद . पुढे पायऱ्या चढून गेल्यावर आत मोठी ओसरी . मागे देवघर , स्वयंपाकघर , शयनगृहे इत्यादी ! इथल्या प्रत्येक वाड्यात ओसरीच्याखाली लपण्यासाठी सुरक्षित तळघर आहे . वाड्याच्या चोहोबाजूला चिरेबंदी भिंती व आत लाकडी बांधकाम !
१९६० - ६२ पर्यंत पंढरपुरात वीज नव्हती . अंधार पडल्यावर सर्व व्यवहार रॉकलेची चिमणी किंवा कंदिलावर चालत . दुकानात पेट्रोमॅक्स बत्त्या होत्या . शालेय वयात उन्हाळ्याची सुट्टी लागली की पंढरपुरी जाण्याचे वेध लागत . १९६० च्या आधी मुंबईहून केवळ रेल्वेने पंढरपुरी जाता येत असे . गाडीला गुलबर्गा वाडी , रायचूर , गुंटकळ , मद्रास आदी बोग्या लागत . तिला सोलापूरचा फक्त एक जनरल डबा असे . त्यात प्रचंड गर्दी असे . ट्रंक , वळकटी आणि फिरकीचा तांबा घेऊन त्यात चढणे , या साध्या कल्पनेनेही अंगावर काटा येत असे .
पंढरपूरच्या स्टेशन रोडला , पद्मावती मंदिराच्या समोर पत्र्याच्या शेडमध्ये चार फलाटांचा एस . टी . स्टॅण्ड होता . तिथून जास्तीत जास्त लांब म्हणजे पुण्यापर्यंत जाता येत असे . १९६५ मध्ये , मुंबई - पंढरपूर - कोळे अशी थेट एस . टी . सुरू झाली . त्यानंतर १६ फलाटांचा नवा एस . टी . स्टॅण्ड बांधण्यात आला . सध्या आषाढी - कार्तिकी वारीला महाराष्ट्राच्या विविध भागांतून , इतर राज्यांतून जवळजवळ दोन हजार एस . टी . बस येतात . इतर खाजगी बस वेगळ्या . पूर्वी दशमीपर्यंत गावातली वारी हलत नसे . पण सध्या रेल्वे आणि एस . टी . ने उत्तम सोय केल्यामुळे द्वादशीलाच पंढरपूर रिकामे होते .
देवळासभोवतीचा परिसर अरूंद गल्ल्याबोळांनी भरलेला होता . एखाद्या बोळात गाईम्हशींचा कळप घुसला तर बाजूला सरकायलाही जागा उरत नसे . चाळीस वर्षांपूर्वी पंढरपूरचे जिल्हा अधिकारी रमानाथ झा यांनी मास्टर प्लॅन राबवत देवळाभोवतीचे सर्व रस्ते रूंद केले . अनधिकृत बांधकामे , दुकाने , टपऱ्या पाडल्या . आज देवळाच्या दारात कोणतेही वाहन येऊ शकते .
१९६४ ते १९८० या काळात देवळाचे नूतनीकरण करण्यात आले . तेथील जुना , जीर्ण झालेला लाकडी मंडप पाडून तिथे दगडी मंडप उभारण्यात आला . तिथल्या भिंतीवर सांगलीचे चित्रकार कल्याण शेटे यांनी रूक्मिणी स्वयंवरातील प्रसंग चितारले . पूर्वी देवदर्शनासाठी स्त्री आणि पुरुषांची वेगळी बारी होती . भाविकांना थोडक्याने एकदम आत सोडले जाई . त्यामुळे प्रचंड गडबडगोंधळ उडत असे . सध्या फक्त एकच बारी आहे . सर्वाना एकाच रांगेत उभे राहून शिस्तीने दर्शन घ्यावे लागते , त्यामुळे सध्या धक्काबुक्की होत नाही , पावसापाण्यात उभे रहावे लागत नाही . वर्षातून चारपाच वेळा देऊळ स्वच्छ धुतले जाते . सर्वत्र सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत . त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण फारच कमी झाले आहे .
पंढरपूरची लोकसंख्या पंचवीस हजार होती , तेव्हा लाखाची वारी भरत होती . आज लोकसंख्या दीडदोन लाखांवर पोचली , तेव्हा हीच वारी बारापंधरा लाखांवर पोचली आहे . पूर्वी पायी चालत येणाऱ्या भाविकांचे प्रमाण साठ टक्क्यांवर होते . आजकाल रेल्वे , एस . टी . व खाजगी गाड्या करून सत्तर टक्के लोक येतात . दिंडीबरोबर थोडे अंतर पायी चालणे ही सुशिक्षित मध्यम वर्गीयांत फॅशन झाली आहे . गेल्या पंचवीस वर्षांपर्यंत यात्रेकरू गावातच मुक्काम करत असत . देवळासभोवतीच्या उत्पात , बडवे , सेवेकरी , क्षेत्रोपाध्ये याच्या वाड्यात खणाला चाळीसपन्नास रूपये प्रति दिवस भाडे देऊन हे यात्रेकरू रहात . येताना चार दिवस पुरेल इतका भाकर तुकडा आणत किंवा बरोबर शिधा आणून चुलीवर आपले जेवण शिजवित . एकेका खोलीत वीस लोक राहत . गावात विविध समाजाचे , जातीचे चारपाचशे मठ व धर्मशाळा आहेत . तिथे दोनअडीच लाख लोक रहात . गावात हाताच्या बोटावर मोजण्या इतकी लॉजेस होती . तिथे सुखवस्तू लोक रहात . बाकी गोरगरीब उघड्यावर झोपडे बांधून रहात . हे यात्रेकरू उरलेले शिळे अन्न उकिरड्यावर फेकून देत . गावात भटकी डुकरे आणि गाढवांचा मुक्त संचार होता .
गावात सर्वत्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला उघडी गटारे होती . घरातील लहान मुलांना प्रातर्विधीसाठी या गटारांवर बसवले जात असे . घरोघरी टोपली संडास होते . मैला डोक्यावरून वाहून नेला जात असे . या सर्व घाणीमुळे पंढरपूरात रोगराई पसरत असे . कॉलरा , मलेरियाची लागण झाल्याने दरवर्षी शेकडो लोक मृत्यूमुखी पडत . बाहेरगावच्या प्रत्येक माणसाला पंढरपूरच्या हद्दीत शिरताना कॉलऱ्याचे इंजेक्शन घ्यावे लागत असे . त्याचे सर्टिफिकेट जवळ बाळगावे लागे . वारीच्या तीन दिवसांत सफाई कामगार प्रचंड गर्दीमुळे कामच करू शकत नसत . अलिकडच्या काळात मास्टर प्लॅनमुळे देवळासभोवतीचे सर्व रस्ते रूंद झाले . उघडी गटारे बंद झाली . भूमीअंतर्गत गटारे बांधली गेली ड्रेनेज सिस्टिममुळे डोक्यावरून मैला वाहणे हा क्रूर प्रकार बंद झाला . अजूनही वारीनंतर पंढरपुरात डेंग्यू , चिकनगुनीया , मलेरियाची लागण होते . सध्या कुणालाच कॉलऱ्याचे इंजेक्शन घ्यावे लागत नाही . अर्धी यात्रा गावाबाहेरच थांबते . भाविक मुखदर्शन झाले नाही , तरी कळसाचे दर्शन घेऊन घरी परतात .
महाराष्ट्रात फक्त पंढरपूरलाच यात्रा कर होता . सुरुवातीला तो माणशी चार आणे होता . नंतर तो वाढत वाढत दोन रुपये झाला होता . पंढरपूरला देवदर्शनासाठी गरीब यात्रेकरू येत , त्यांना तो कर परवडत नसे . वारकरी चेष्टेने त्याला जिझिया कर म्हणत . राज्य सरकार या वारीच्या नियोजनासाठी पंढरपूर नगरपालिकेला वर्षाकाठी दोन लाख रुपयांचे अनुदान देत असे . त्यात हा यात्रा खर्च भागवणे पालिकेला शक्यच नव्हते . शेवटी वारकरी संप्रदायाच्या मागणीला मान देऊन माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटलांनी मध्यस्थी करून हा यात्रा कर रद्द केला व सरकारी अनुदान वाढवून दिले . सध्या तर राज्य सरकार या नगर पालिकेला एक कोटी रूपये वार्षिक अनुदान देते . पंढरपूरची किर्ती वाढतेच आहे .

Nearby cities:
अक्षांश-रेखांश : 17°40'14"N 75°19'16"E
- Dr.Salunkhe Hospital,Pandharpur 0.5 किमी.
- Shri Ganpati Multi-specialty Hospital 0.6 किमी.
- 'Mauli Krupa' - Mr.Uttamrao Khapale 0.9 किमी.
- Reliable Computer Systems, Shivyogi Mangal Bhawan 1 किमी.
- yashwant vidhyalaya latur 1 किमी.
- rahul shinde's bungolve 1.9 किमी.
- Moholkar SS house (All Society View) 2.2 किमी.
- Gadegaon Fata 3.8 किमी.
- (ND) 3.8 किमी.
- Rohit Gaikwad Wakhari 5.2 किमी.