महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ,पंचतारांकित निवास व्यवस्था (चिखलदरा)

India / Maharashtra / Achalpur / चिखलदरा
 रिसॉर्ट, all-inclusive resort (en)
 Upload a photo

विदर्भातील एकमेव थंड हवेचे ठिकाण असलेल्या चिखलदरा येथे आता पर्यटकांकरिता पंचतारांकित निवास व्यवस्था उपलब्ध होणार असून ११ एप्रिलला या विशेष पर्यटक निवासाचा प्रारंभ होणार आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्यावतीने ही नवी व्यवस्था चिखलदरा येथे उभारण्यात आली आहे.
ताडोबा किंवा पेंच व्याघ्रप्रकल्पांच्या तुलनेत चिखलदऱ्याकडे वळणारी पर्यटकसंख्या बरीच कमी असते. विविध प्राणिसंपदा व समृद्ध वने असलेल्या या पर्यटनस्थळी पर्यटकांचा हा ओघ वाढावा, यादृष्टीने चिखलदरा पर्यटन महोत्सवासारख्या प्रयत्नांना गेल्या काही वर्षांत सुरुवात झाली आहे. त्याच मालिकेतील पुढचे पाऊल म्हणून नव्या पर्यटक निवासाकडे बघण्यात येत आहे.
अमरावती जिल्ह्यातील या पर्यटनस्थळी भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने आधुनिक सोयी असलेले पंचतारांकित पर्यटक निवास उभारले आहे. या पर्यटक निवासात चार वातानुकूलित व्हीआयपी सूटस्, १० वातानुकूलित डिलक्स सूटस्, एक उपाहारगृह, एक बैठक कक्ष, मनोरंजन कक्ष तसेच योगा व ध्यानकेंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. विविध कार्यक्रमांच्या आयोजनाकरिता रंगमंच व पार्किंग सुविधाही या निवासाच्या परिसरात तयार करण्यात येणार आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   21°23'51"N   77°19'29"E
  •  405 किमी.
  •  433 किमी.
  •  477 किमी.
  •  488 किमी.
  •  516 किमी.
  •  807 किमी.
  •  910 किमी.
  •  1007 किमी.
  •  1077 किमी.
  •  1129 किमी.
This article was last modified 10 वर्षांपूर्वी