कोलकास

India / Maharashtra / Anjangaon /

महाराष्ट्राच्या वनविभागाने ' ढाकणा-कोलकास ' परिक्षेत्राला १९६९ साली अभयारण्याचा दर्जा दिला. ढाकणा परीक्षेत्राचा उदयकाल १८६० नंतरचा असल्याची माहिती मिळते. शंभर वर्षानंतर ढाकणा मागे पडून ' कोलकास ' तेवढे पर्यटन स्थळ म्हणून बहुमुखी झाले. विविध पशुपक्षी आणि वनस्पती यामुळे देशभरातून विद्यार्थी या पर्यटन स्थळाकडे ज्ञानपिसासेमुळे येऊ लागले. पक्षी आणि विविध जातीच्या वनस्पतीमुळे तुलनेने कोलकासचा बराचसा बोलबाला झाला. याच प्रकरणात रात्री-अपरात्री ऐकू येणाऱ्या घुंगराच्या आवाजाचे भयनाट्य तोंडातोंडी ऐकू येऊ लागले होते. घुंगराच्या आवाजाचे रहस्य एक दिवस उजेडात येते. बंगल्या शेजारी राहुटीला असणाऱ्या फॉरेस्ट गार्डनं मुंगसांच पिल्लू पाळलं होतं. पाळीव प्राण्याच्या गळ्यात घुंगरू बांधण्याची पद्धत आहेच. वयात येताच हे पाळीव मुगूस घर सोडून पळालं , नि जंगलात रमलं. रात्री कधीतरी बंगल्याच्या आवारात इकडून तिकडे हुंदडायचं मग छम् छमा छम् आणि भुताटकीचा माहोल सुरू व्हायचा , तर अशी ही घुंगराच्या आवाजाची रहस्यकथा सुरू झाली होती. याच प्रकरणात कालू पटेल नावाच्या राहुटीला असलेल्या पहिल्या गावकऱ्याचा उल्लेख येतो. या कालू पटेलला जवळपास पन्नास मुले होती. त्या सर्वांनी मिलून ढाकण्याचा पडाव वसविला.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   21°29'53"N   77°12'17"E
This article was last modified 11 वर्षांपूर्वी