पोस्ट-मास्तर जोश्यांचे घर (Awas)

India / Maharashtra / Alibag / Awas / Awas Beach Road
 निवास, टपाल कार्यालय
 Upload a photo

आवास हे अलिबागपासून १०/१२ कि. मी.वर मुंबईला खेटूनच आमचं जोश्यांचे गाव! माझ्या आठवणीपासून गेल्या ३५/४० वर्षांत गावाचा आणि घराचाही कायापालट झालाय. पूर्वीचं आमचं कौलारू घरही आता दुमजली झालंय. कालानुरूप बदललंय. आजोबांचे वडील नेवरे सोडून इथे आले त्यालाही १२० वर्षे उलटून गेली. पूर्वी पेंढय़ाच्या घरात राहणाऱ्या आजोबांनी १९६० च्या सुमारास मोठं कौलारू घर बांधलं. किराणा मालाचं दुकान सांभाळणाऱ्या आजोबांनी घर बांधताना बऱ्याच गोष्टीत दूरदृष्टी ठेवली होती. त्या काळात आमच्या घरात यायला गाडी रस्ता किंवा उतार-रस्ता केला होता, जो अजूनही आमच्या घराची खूण म्हणून परिचित आहे. आम्हा मुलांसाठी धावायची घसरगुंडी! या रस्त्याने उद्या आपली मुले-नातवंडे गाडय़ा वर आणून अंगणात उभ्या करू शकतील, अशी कल्पना आणि इच्छाही!! त्याच्या बाजूला ३/४ पायऱ्या.
१९७०-७२ला घरात पोस्ट आले. मला अस्पष्ट आठवतं तो बाहेरच्या गंजांवर लावलेला भारताचा मोठा नकाशा, बाजूला टांगलेली लाल पोस्टाची पेटी, येणाऱ्या माणसांना बसायला बाक, कोपऱ्यात मोठा काळा टेलिफोन आणि उंच लाकडी खुर्चीत बसलेले, नाकावर सरकलेल्या चष्म्यातून बाहेर नजर ठेवणारे आजोबा.
तेथून पायरी चढून गेलं की आत आजी-आजोबांची खोली आणि त्यापुढे दक्षिण दरवाजाची छोटी खोली. ही आजीची आवडती जागा असावी. स्टोव्ह साफ करायला, वाती कापायला आणि मुख्य म्हणजे माझ्याशी पत्ते खेळायला आजी इथेच बसायची. आमचा घडय़ाळ-डाव खूप वेळा रंगायचा तिथे. आतल्या कुठल्याच खोल्यांना दरवाजे नव्हते. त्याच्या डाव्या बाजूला मोठे माजघर. माजघरात स्वयंपाक घराजवळच्या कोपऱ्यात देवघर. समोर चौरंग ठेवलेला. त्यावर बसून आजोबा पूजा करायचे. माजघरात वावर जेवणाच्या पंगतीपुरता आणि रात्री निजायला. बाकी सारा वेळ माजघराच्या पुढच्या पडवीत मोठय़ा झोपाळ्यावर असायचा. दिवाळी आणि मेच्या सुट्टीतला दंगा आणि आरडाओरड तिथेच. नंतर खालेल्या आजीच्या ओरडय़ाने झोपाळाही आमच्याबरोबर शांत व्हायचा.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   18°46'5"N   72°52'10"E
  •  48 किमी.
  •  93 किमी.
  •  169 किमी.
  •  278 किमी.
  •  476 किमी.
  •  582 किमी.
  •  784 किमी.
  •  813 किमी.
  •  879 किमी.
  •  958 किमी.
This article was last modified 7 वर्षांपूर्वी