Wikimapia is a multilingual open-content collaborative map, where anyone can create place tags and share their knowledge.

Panju

India / Maharashtra / Mira Bhayandar /
 fishing village (en)  गट निवडा
 Upload a photo

वसई खाडीवर असलेल्या जुन्या रेल्वे पुलावरून टाकण्यात आलेली पाण्याची पाइपलाइन आणि विजेची केबल त्वरित काढून टाकण्याचा आदेश पश्चिम रेल्वेने दिल्यामुळे पाणजू बेटावरील नागरिकांची झोप उडाली आहे. या पाइपलाइनद्वारे पाणजू गावाला पाणीपुरवठा करण्यात आला आहे व केबलद्वारे गावातील घरांना वीज पुरविण्यात आलेली आहे. त्यामुळे गावचा पाणी व वीजपुरवठा बंद होणार आहे.

पाणजू गावाला पाण्याची पाइपलाइन मिरा-भार्इंदर महापालिकेच्या हद्दीतून तर विजेची केबल वसई-विरार महापालिकेच्या हद्दीतून टाकण्यात आलेली आहे. त्यासाठी वसई खाडीवरील जुन्या (इंग्रजकालीन) रेल्वे पुलाच्या खांब क्रमांक ७३ व ७५ चा वापर करण्यात आला आहे. परंतु, हा जुना पूल मोडीत काढायचा असल्याने रेल्वेन पाणजू ग्रामपंचायतीस तसे कळविले आहे.

खाडीच्या पाण्याने चहूबाजूंनी वेढलेल्या पाणजू गावात देशाच्या स्वातंत्र्यानंतर १९७१ साली पिण्यासाठी पाणी उपलब्ध करण्यात आले आणि १९८६ साली वीज प्रश्न सोडविण्यात आला. एमएमआरडीएने हा पूल हलक्या वाहनांसाठी उपयुक्त नसल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेला पूल मोडीत काढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Nearby cities:
अक्षांश-रेखांश :   19°20'12"N   72°50'46"E
This article was last modified 10 वर्षांपूर्वी